पुणे, ता. २५ ः ‘‘विद्यार्थ्यांनी आर्थिक साक्षर असणे आजकालच्या जगात अत्यंत आवश्यक आहे. पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी पैशांचे नियोजन असणे गरजेचे आहे. सोने विकत घेऊन ते घरात साठवून ठेवण्यापेक्षा, ते ऑनलाइन पद्धतीने घेऊन आपण सुरक्षितपणे साठवू शकतो. या ऑनलाइन पद्धतीने सोने खरेदीचा सरकारला, तसेच आपल्यालासुद्धा फायदा होतो. यासंबंधीची जनजागृती वाढविणे गरजेचे आहे,’’ असे मत विघ्नहर्ता गोल्ड लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र लुनिया यांनी मांडले.
‘सकाळ’ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)तर्फे शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज बीबीए येथे ‘आर्थिक साक्षरता व उद्योजकता विकास’ परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी लुनिया बोलत होते. ते म्हणाले, ‘‘डिजिटल गोल्ड या संकल्पनेला केवळ जनजागृतीची आवश्यकता आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना डिजिटल गोल्डबद्दल माहिती करून द्यावी लागेल. जसे आपण गाडीचे इंजिन नीट चालण्यासाठी गाडीमध्ये ऑइल टाकतो, त्याचपद्धतीने आपल्या देशाचे इंजिन पुढे नेण्यासाठी आपल्याला डिजिटल गोल्डमध्ये जागरूकता आणण्याची गरज आहे.’’
यावेळी यिन कार्यकारिणीतील मॉडर्न कॉलेजचे अध्यक्ष अनिकेत बनसोडे, उपाध्यक्ष प्रवीण सोनटक्के, तसेच मॉडर्न कॉलेज इंजिनिअरिंग अध्यक्ष सुमीत पतंगे, यिन सदस्य वैष्णवी नाईकडे यांचा सत्कार लुनिया यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद आळंदीकर व बीबीए विभागाच्या प्रा. जस्मित पाटील उपस्थित होते. किरण भणगे हिने सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.