पुणे

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पुणे पोलिसांकडून कारवाईची शक्यता

CD

पुणे, ता. १६ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनप्रकरणी अटक करण्यात आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबर्इ, सातारा पाठोपाठ आता पुणे पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे. आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी ॲड. सदावर्ते यांच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याबाबतचा अहवाल पुणे पोलिसांनी गृहविभागाकडे पाठविला आहे.
एक सप्टेंबर २०२० रोजी सदावर्ते यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याबाबत अमर रामचंद्र पवार (रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली होती. पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनानंतर सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी सुरू असतानाच सातारा पोलिसांनी एका प्रकरणात सदावर्ते यांना अटक केली. सातारा न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ॲड. सदावर्ते यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शासनाकडून आदेश मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे भारती विद्यापीठ ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: जिममध्ये चोरी करुन फसला... चोराला लोकांनी दिली अनोखी शिक्षा, व्हिडिओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

ऐतिहासिक घोषणा! 'किल्ल्यांच्या सन्मानाने भाजपचा जल्लोष'; १२ गड-किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश

Pune Robbery: पुण्यात अधिकारीच सुरक्षित नाहीत? मध्यरा‍त्री बंगल्यात घुसून विंग कमांडरच्या तोंडावर हात ठेवला अन् धक्कादायक दरोडा!

Ahilyanagar News: वाघोलीत दहा हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट; झेडपी सीईओंच्‍या हस्‍ते ‘एक पेड माँ के नाम’; विकासकामांची पाहणी

​PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार? जाणून घ्या सर्वात महत्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT