पुणे

''बी. जे. वैद्यकीय'' संस्थेकडून संशोधनाचे बीज रोवण्याचे कार्य

CD

पुणे, ता. २१ : “वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनात देश मागे पडत आहे. त्यामुळे नवीन पिढीमध्ये संशोधनाचे बीज रोवण्याचे कार्य बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयासारख्या संस्था करू शकतात,” असा विश्वास डॉ. हिम्मतराव बावसकर यांनी येथे व्यक्त केला.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातर्फे ४८व्या संशोधन परिषदेचे आयोजन केले होते. त्याचे उद्‌घाटन डॉ. बावसकर यांच्या हस्ते झाले. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, डॉ. विश्वनाथ येमुल, डॉ. प्रज्ञा भालेराव, डॉ. पद्मसेन रणबागळे, डॉ. सरफराज पठाण हे या वेळी उपस्थित होते.
डॉ. बावसकर म्हणाले, “कुठल्याही देवळाच्या पायाऱ्यांसमोर नतमस्तक न होता आपल्याला शिक्षण देणाऱ्या संस्थांना मातेचे स्थान द्या. त्यामुळे आपण आजन्म या पुढे नतमस्तक होऊ. संशोधन करण्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. ही शक्ती महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली जाऊ शकते. उपलब्ध मनुष्यबळ व साधने यामध्ये योग्य संशोधन करता येते. त्यासाठी कोणत्याही अतिरिक्त आर्थिक मदतीची गरज नाही. विंचूच्या चाव्यासाठी प्रझोसिन नावाच्या औषधाचा वापर, हे याचे उदाहरण आहे. त्यामुळे विंचूच्या चाव्याने होणाऱ्या मृत्यूचा प्रमाण ४० टक्क्यांवरून एक टक्क्यांपर्यंत खाली आले.”
या परिषदेच्या आयोजनासाठी बधिरिकरणशास्त्र विभागाच्या डॉ. प्रा. संयोगिता नाईक, प्रा. डॉ. सुरेखा शिंदे आणि डॉ. प्रज्ञा भालेराव यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT