पुणे

हवामान बदलाचा परिणाम फुलपाखरांच्‍या जीवनचक्रावर

CD

पुणे, ता. ५ ः हवामान बदलाचा परिणाम केवळ आता मॉन्सून पुरता मर्यादित राहिलेला नसून, जीवसृष्टीच्या अस्तित्वात कळीची भूमिका बजावणाऱ्या फुलपाखरांवरही याचा गंभीर परिणाम झाला आहे. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील अण्णासाहेब कुलकर्णी जैवविविधता विभागाचे प्रमुख डॉ. अंकुर पटवर्धन यांच्या निरीक्षणातून ही बाब पुढे आली आहे.

असा केला अभ्यास
- अंकुर पटवर्धन यांनी फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी घरात फुलपाखरांची ‘लिव्हिंग लॅब’ साकारली
- दोन वर्षांपासून दररोज फुलपाखरांच्या जीवनचक्रातील प्रत्येक टप्प्यांचे निरिक्षण
- वर्षभरात बागेत ३० ते ४० फुलपाखरांच्या प्रजातींची भेट
- आतापर्यंत विविध प्रजातींच्या ६०० पेक्षा जास्त फुलपाखरांचे निरीक्षण

काय झाला परिणाम?
- फुलपाखरांच्या प्रजातीनुसार त्यांचे कोशातून बाहेर येण्याचे प्रमाण हे सामान्यतः १० ते २० दिवसांचे
- आता या कालावधीत वाढ होत असून काही प्रजाती ‘हायबरनेशन’ म्हणजेच निद्रिस्त स्थितीमध्ये जास्त कालावधी व्यतीत करतात.
- हवामान बदलांमुळे कधी कधी अनेक महिन्यांपर्यंत कोषात राहू शकतात
- ऋतुचक्रातील बदल आणि यामुळे खाण्याची सवय आणि चयापचय क्रियेमध्ये होणारा बदल ही मुख्य कारणे
- फुलपाखरांच्या जीवनचक्रासाठी उपयुक्त परिस्थिती पाहता किमान तापमान सरासरी १२ ते १६ अंश सेल्सिअस
- कमाल तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ही सरासरी ६० ते ६५ इतकी असते
- ही स्थिती प्रजातीनुसार अवलंबून
- यात लक्षणीय बदल झाल्यास परिणाम फुलपाखरांवरही दिसून येतो

असा बसतो फटका
- तापमानात झपाट्याने वाढ झाल्यास फुलांच्या पाकळ्या लवकर मिटतात
- त्यामुळे वनस्पतींच्या परागीभवनावर परिणाम
- पाकळ्या बंद झाल्याने फुलपाखरांना फुलातील रस शोषून घेण्यात अडथळा येतो.
- चयापचय कमी झाल्याने त्यांचे जीवनचक्र मंदावते

जीवनचक्रात बदल
- ऋतुचक्रानुसार प्रत्येक जीव आपल्या क्रियांना चालना देतो
- फुलपाखरं सुद्धा आपले जीवनचक्र पूर्ण करतात
- हवामान बदलामुळे सध्या ऋतुचक्रांमध्ये बदल पाहायला मिळतात
- यामुळे फुलपाखरांच्या जीवनचक्रात आता बदल दिसू लागले आहेत
- फुलपाखरांचा मृत्यू दर हा ८० टक्के असतो
- परिसरात आढळणारी फुलपाखरे केवळ १० ते २० टक्के इतकी असतात
- त्यामुळे फुलपाखरांच्या संवर्धनासाठी त्यांच्या जीवनचक्राचे निरीक्षण आणि त्यानुसार योग्य उपाययोजना करण्याची आवश्‍यकता

हे करणे गरजेचे
- वाढत्या तापमानानुसार कोशातून बाहेर येण्याच्या फुलपाखरांचे पंख दुमडलेले आहेत का, शरीराचा आकार कमी-जासत अशा विविध परीणाम अभ्यासणे
- वाढत्या तापमानानुसार कोशातून बाहेर येणारे फुलपाखरू हे नर किंवा मादी आहे का याचा अभ्यास करणे

फुलपाखरांची नैसर्गिक अवस्थेत निरीक्षणे करता येतात. यासाठी प्रयोगशाळा असणे आवश्‍यक नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षण, नागरिक यांनी आपापल्या परिसरातील फुलपाखरांचे निरिक्षण करणे गरजेचे आहे. स्थानिक पातळीवरील हवामान बदलाचा परिणाम समजण्यासाठी या किटकांच्या हालचाली, जीवनचक्र यातील बदल, अचानकपणे होणारी वाढ किंवा घट हे नक्कीच हवामान बदलांना दर्शविणारे संकेत देतात.
ते संकेत समजणे यासाठी संयम राखत निरीक्षणे करणे अत्यंत गरजेचे आहे.
- अंकुर पटवर्धन, जीवशास्त्र अभ्यासक

हवामान बदलाचे ‘जैवनिर्देशक’
हवामानाचा चांगला किंवा वाईट बदल होत आहे, हे समजण्यासाठी फुलपाखरांप्रमाणे काही इतर किटक ‘जैवनिर्देशक’ म्हणून काम करतात. यांचे सातत्याने निरीक्षण करणे हा महत्त्वाचा भाग असून सध्या हे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे बायोइंडिकेटर्सकडून मिळणारे सिग्नलसमजून त्यानुसार हवामान बदलाशी निगडित कृती आराखडा करणे शक्य होईल, असेही अंकुर पटवर्धन यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तोंदलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

SCROLL FOR NEXT