पुणे

ऑनलाइन फसवणूक केलेल्या आरोपीस दिल्लीतून अटक

CD

ऑनलाइन फसवणूक केलेल्या संशयितास दिल्लीतून अटक
बार्शी शहर पोलिसांची कामगिरी; दोन लाखांची रक्कम फिर्यादीस केली परत
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. २६ : तीन वर्षांपूर्वी बार्शीतील एका शिक्षकाची मोबाईल फोनवरून फसवणूक करत बँकेतील १ लाख ९८ हजार २०८ रुपये विनापरवाना काढणाऱ्या संशयित आरोपीस बार्शी पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. नरेश महेशचंद्र शर्मा (वय ४५, रा. बगीची रघुनाथ, नॉर्थ दिल्ली) यास बार्शी शहर पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतले. शुक्रवारी (ता. २६) त्यास प्रथम वर्ग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
१३ फेब्रुवारी २०२२ रोजी फिर्यादी महादेव विठ्ठल मिरगणे (वय ५३, रा. गाडेगाव रोड, बार्शी) यांना क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा, असे शर्मा याने सांगितले. त्यावरून मिरगणे आणि ओटीपी सांगताच क्रेडिट कार्डवरून १ लाख ९८ हजार २०८ रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. त्यानंतर मिरगणे यांनी बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिसांकडे होता.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी २०२२ मधील गुन्ह्याचा आढावा घेतला असता, हा गुन्हा प्रलंबित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावरून त्यांनी तत्काळ बार्शी शहर पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करून योग्य त्या सूचना केल्या. त्यावरून पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे यांच्यासह कर्मचारी दिगंबर बरबडे, सचिन नितनाथ यांचे एक पथक दिल्लीला पाठवले. या पथकाने संशयित आरोपीची गोपनीय माहिती काढून तो सदर बझार नॉर्थ परिसरात राहात असल्याची खात्री केली. त्यावरून मागील आठवड्यात कुकडे यांनी पोलिस उपनिरीक्षक अभय माकणे, दिगंबर बरबडे, सचिन नितनाथ, अवी पवार यांचे एक पथक दिल्ली येथे पाठवले व संशयित आरोपी नरेश शर्मा यास बगीची रघुनाथ, नॉर्थ दिल्ली येथून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अटक करत त्यास बार्शीत आणले. संशयित आरोपीने फिर्यादीची सर्व रक्कम काही वेळातच परत केली.
बार्शी पोलिसांच्या या कार्याबाबत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलिस उपअधीक्षक अशोक सायकर यांनी पोलिस निरीक्षक कुकडे यांच्यासह सर्व टीमचे अभिनंदन केले. कोणाची सायबर फसवणूक झाल्यास १९३० या नंबरवर तत्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack on Farmer : पतीसाठी सावित्री होऊन धावली पत्नी! बिबट्याने शेतकऱ्यावर झडप घातली, पण ती जीवाची पर्वा न करता थेट बिबट्याशी भिडली!

Nagpur News: सावनेरमध्ये तरुणाने संपवले जीवन; मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात

'आज माझी हळद आणि उद्या...' मृणालने धनुषसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा, म्हणाली.. 'मी माझ्या वडिलांना...'

Phalgun Sankranti: फाल्गुन संक्रांतीला चतुर्ग्रही योग! 'या' राशींना मिळणार मोठी गुड न्यूज, पैशाची चणचण होईल दूर

Nagpur Accident: बारावीच्या पेपरला जाताना काळाचा घाला; टिप्परच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT