बावडा, ता. २७ : श्रीराज विजय गायकवाडने रनिंग स्पर्धेत मिळवले सिल्व्हर व ब्राँझ पदक मिळविले आहे. शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल कडून रनिंग स्पर्धेमध्ये ७५ मीटर व १०० मीटर व रिले ४०० मीटर मध्ये श्रीराज विजय गायकवाड इयत्ता सहावी याने तीनही खेळात सहभागी होऊन तीन मेडल अनुक्रमे सिल्व्हर दोन व ब्रॉंझ पदके एकाच दिवसांत मिळवली आहेत.
या स्पर्धा क्रीडा संकुल अकलूज येथे पार पडल्या श्रीराज विजय गायकवाडने रनिंग स्पर्धेत स्तरातून कौतुक होत आहे. या कामी शिक्षक श्रीमती रागिणी शेलार, शकिला पठाण यांनी मार्गदर्शन केले, या वेळी श्रीराज गायकवाड याचा सत्कार शीतल देवी मोहिते पाटील, प्रणिता भालके, प्राचार्य अल्बर्ट बिनो, वडील विजय गायकवाड यांनी केला.