पुणे

सत्काराला नाव पुकारले अन् पोलिसांनी पकडले

CD

बजाजनगर (जि. छत्रपती संभाजीनगर), ता. १६ : आपण पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) सचिव असल्याची बतावणी करणाऱ्या एका तोतयाला रविवारी येथील एका बड्या लग्नसोहळ्यात पकडले. त्याच्यासह त्याच्या अंगरक्षकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. लग्नसमारंभातील सत्कार सोहळ्यात त्याचे नाव पुकारताच अन्य अधिकाऱ्यांना संशय आल्याने हा भंडाफोड झाला. तोतयाचे नाव अशोक भरत ठोंबरे (वय ४५, रा. दिल्ली, मूळ रा. उंड्री, ता. बीड) तर अंगरक्षकाचे नाव विकास प्रकाश पंडागळे (वय ३५, रा. कोंढवा खुर्द, मनीष पार्क, पुणे) असे आहे.
सोलापूर-धुळे महामार्गावरील एका हॉटेलमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलीचे रविवारी लग्न होते. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने कडेकोट बंदोबस्त होता. निमंत्रितांमध्ये नेते आणि मोठे अधिकारी होते. मुख्यमंत्री येण्यापूर्वी मान्यवरांचा सत्कार सोहळा होता. यासाठी निवेदकाने दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयातील सचिव म्हणून अशोक ठोंबरे यास मंचावर आमंत्रित केले. त्यावेळी झोन एकचे पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांना ठोंबरे याच्या वर्तनावर संशय आला. त्यांनी तत्काळ त्याची चौकशी केली. प्रश्नांची उत्तरे देताना ठोंबरे गडबडल्याने पोलिसांनी लगेचच पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधला. चौकशीत या नावाचा कोणीही अधिकारी पंतप्रधान कार्यालयात नसल्याचे स्पष्ट झाले. एवढेच नाही, तर ठोंबरेसोबत त्याच्या मोटारीमध्ये पंडागळे होता. तो स्वतःला ठोंबरेचा अंगरक्षक सांगत होता. दोघांना पोलिस ठाण्यात नेत त्यांची चौकशी केली असता तो सचिव म्हणून फसवणूक करत असल्याचे उघड झाले. त्याच्या वाहनातून ‘भारत सरकार’ असे लिहिलेला बोर्डही जप्त करण्यात आला.

अंगरक्षक म्हणवणारा पुण्यातील
बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेला ठोंबरे सध्या दिल्ली येथील सदर बाजारमधील केंड फ्लोअर येथे राहतो, तर त्याचा अंगरक्षक म्हणून वावरणारा पंडागळे पुण्यातील कोंढवा खुर्दमधील मनीष पार्क येथील रहिवासी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT