पुणे

राजगुरुनगरचा विकास हाच आमचा ध्यास

CD

चास, ता. २६ : राजगुरुनगरचा विकास हाच आमचा ध्यास आहे. जास्तीत जास्त वेळ नागरिकांमध्ये व्यतीत करून समस्या समजावून घेत त्याचे निराकरण करण्याबरोबरच एक व्हीजन घेऊन आम्ही राजगुरुनगर शहरात काम करण्यावर असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांनी केले.
राजगुरुनगर येथे समस्त गुंडाळ परिवाराच्या वतीने नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ व नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आशा अरुण गुंडाळ यांचा जाहीर सत्कार गुरुवारी (ता. २५) करण्यात आला, या सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष गुंडाळ बोलत होते. यावेळी अनेक मान्यवरांसह गुंडाळ परिवाराच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वढू बुद्रुकचे नवनाथ गुंडाळ, विठ्ठल महाराज गुंडाळ, मधुकर गुंडाळ आदींनी शुभेच्छा दिल्या.
नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ म्हणाले की, ‘‘हा माझा घरचा सत्कार असून मला माझ्या परिवाराने जे प्रेम दिले ते प्रेम कायम असू द्या, राजगुरुनगरचा विकास हाच आमचा ध्यास राहणार आहे.’’ नगरसेविका आशा गुंडाळ म्हणाल्या की, ‘‘हा माझ्या सत्कार नसून हा आपल्या कुटुंबाचा सत्कार आहे, केवळ माझा विजय नसून आपल्या परिवाराने दाखवलेल्या प्रेमाचा विजय आहे, मतदारांनी मतदानरूपी केलेले प्रेम कधीच विसरणार नाही,’’ असे भावनिक होत त्यांनी सांगितले. या समारंभाचे नियोजन फौजी गणेश गुंडाळ, गणेश शंकर गुंडाळ, गौरव गुंडाळ, धनंजय गुंडाळ, चेतन गुंडाळ यांसह अन्य मान्यवरांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश गुंडाळ, संकेत गुंडाळ यांनी केले तर बिबीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य अरुण गुंडाळ यांनी आभार मानले.

4179

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Fraud Case : जयसिंगपुरात जादा परताव्याच्या आमिषाने पावणेसात कोटींची फसवणूक

Latest Marathi News Live Update : देशाच्या तपास यंत्रणांवर आमचा विश्वास नाही- संजय राऊत

Stock Market Today : शेअर बाजार लाल रंगात! IT शेअर्सला मोठा फटका, अमेरिकेचा परिणाम; कोणते शेअर्स घसरले?

Mumbai Crime: मुंबईत थरकाप उडवणारी घटना! रिक्षातून उतरली… तरीही पाठलाग सुरूच; अल्पवयीन तरुणीची अंगावर शहारे आणणारी आपबीती

कोकणच्या सागरी पराक्रमाचा पुरावा! वीरगळावर सापडले प्राचीन नौकायुद्धाचे जिवंत दृश्य, खारेपाटण ठरू शकते भविष्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT