पुणे

श्री. पाटसकर साहेब यांना देणे ही विनंती. सरकारनामा साठी मजकूर...

CD

स्टँडअलोन फोटो - PNE25V76764

....

दोन नेते, दोन दौरे (फोटो - राहुल गांधी, नरेंद्र मोदी)
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे परदेश दौरे नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. मात्र यावेळी सुरू होण्याच्या आधीच त्यांचा जर्मनीचा दौरा भाजपच्या ‘रडार’वर आला. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना गांधी यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आणि लगोलग हा मुद्दा पकडत भाजपवाल्यांनी ‘विदेश नायक’ असा त्यांचा उपहास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अधिवेशनातील बराच वेळ विदेशात असतात. मग केवळ राहुल गांधी यांना कशासाठी लक्ष्य केले जात आहे, असे प्रश्न उपस्थित करत त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी-वद्रा यांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे या चर्चच्या दोन दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जॉर्डन, इथियोपिया आणि ओमान दौऱ्याची घोषणा परराष्ट्र मंत्रालयाकडून झाली. राहुल यांच्यावर टीका केलेल्या भाजपची कोंडी करण्याची संधी यावेळी काँग्रेसकडे होती. पण काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी यांच्या दौऱ्यावर फारशी खळखळ केली नाही. दोन नेत्यांचे दोन दौरे होते. यातील विरोधी पक्षनेत्याच्या दौऱ्यावर सत्ताधाऱ्यांची टीका, तर सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखाच्या दौऱ्यावर विरोधी पक्षाचे मौन असे काहीसे चित्र पाहावयाला मिळाले.

प्रदूषण आणि सिगारेट (फोटो - सौगत रॉय, ई-सिगारेट)
तृणमूल काँग्रेसचे काही खासदार संसदेत ई-सिगारेट ओढतात, असे सांगत भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी खळबळ उडवून दिली होती. वास्तविक संसदेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जाण्यास आणि त्याचे सेवन करण्यास बंदी आहे. संसदेत प्रवेश करताना तमाम प्रवेशकर्त्यांकडून अशा वस्तू काढून घेत त्या कचराकुंडीत टाकल्या जातात. ​अशा स्थितीत खासदार आणि मंत्र्यांना वेगळा नियम आहे का आणि हे लोक ई-सिगारेट अथवा इतर तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जाऊ शकतात काय, अशी चर्चा सुरू झाली. नियम सर्वांसाठी समान रीतीने लागू असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगून काही तासही होत नाही, तोच संसद भवनाच्या बाहेर तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार सौगत राय हे सिगारेट ओढताना दिसून आले. काही मंत्र्यांनी त्याला आक्षेप घेतल्यानंतर राय भाजपवर भडकले. ‘दिल्लीमध्ये सर्वांत जास्त प्रदूषण आहे. त्यामुळे भाजपवाल्यांनी त्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. माझ्या एका सिगारेटमुळे दिल्लीचे प्रदूषण कमी होणार आहे काय,’ असा सवाल उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांची एैशीतैशी करून टाकली.

हजरजबाबी आठवले (फोटो - रामदास आठवले)
सामाजिक न्याय मंत्रालयाच्या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एका खासदाराने दिव्यांगांना मदतसाहित्य वाटपाचा मेळावा घेतला. कार्यक्रम झाला, मात्र सामाजिक न्याय खात्याकडून मदत साहित्य मिळालेच नव्हते. त्यामुळे साहित्य मिळविण्यासाठी दिव्यांगांनी सातत्याने विचारणा सुरू केल्याने हैराण झालेल्या या खासदार महाशयांनी संसद अधिवेशनात या खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवलेंची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा विषय घातला. मदत साहित्यासाठी दिव्यांग मंडळी नियमितपणे आपल्या घरी येत असल्याचे या खासदारांचे म्हणणे होते. ते ऐकताच मंत्री आठवलेंनी ‘त्या सर्वांना माझ्या घरी पाठवा’ असे मिश्किलपणे सांगत खासदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. अर्थात, लगेच गंभीर होत मंत्री आठवलेंनी हा विषय तातडीने मार्गी लावण्याचे आणि मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांकडे याबाबत जाब विचारण्याचे आश्वासनही दिले.

आजारपण की नेतृत्वाचा वाद? (फोटो - सुदीप बंदोपाध्याय)
तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतले माजी गटनेते आणि ज्येष्ठ खासदार सुदीप बंदोपाध्याय संसदेच्या हिवाळी अधिवेशनाकडे फिरकलेले नाहीत. आजारपणाचे कारण देत त्यांनी रीतसर सुटी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी सुदीप बंदोपाध्याय यांच्याकडून गटनेतेपद काढून अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे सोपविले होते. अभिषेक बॅनर्जी तृणमूल काँग्रेसमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि ममता बॅनर्जींचे राजकीय वारसदार म्हणून ओळखले जातात. गटनेते बनल्यानंतर अभिषेक बॅनर्जींचे संसदेतील नेतृत्व स्थिरस्थावर होण्यासाठी सुदीप बंदोपाध्याय यांना संसद अधिवेशनापासून लांब राहण्यास नेतृत्वाकडून सांगण्यात आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तर, आजारपणामुळे संसद अधिशेनात न येणारे सुदीप बंदोपाध्याय मात्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्यात प्रचार मोहिमांमध्ये सक्रिय झाले आहेत.

प्रकृतीची पर्वा न करता... (फोटो - संजय राऊत)
शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर सध्या मुंबईत उपचार सुरू असल्यामुळे यंदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यांना भाग घेता आला नाही. मात्र, मिझोरामचे माजी राज्यपाल आणि दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांच्या आकस्मित निधनामुळे कौशल कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांना दिल्लीला येणे भाग पडले. सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल्य यांच्याशी असलेल्या प्रदीर्घ कौटुंबिक संबंधांना महत्त्व देत आपल्या खालावलेल्या प्रकृतीची; तसेच भीषण स्तरावर पोहोचलेल्या वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या त्रासाची पर्वा न करता संजय राऊत खासदार बांसुरी स्वराज यांचे सांत्वन करण्यासाठी दिल्लीत आले.

दिल्लीचे कान टवकारले.. (फोटो - पृथ्वीराज चव्हाण)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मुंबईला जाण्यापूर्वी पंधरा वर्षांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांचा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चांगलाच प्रभाव होता. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यालयाचे मंत्री म्हणून त्यांचे वजन होते. त्यामुळेच १९ डिसेंबरनंतर भारताला मराठी पंतप्रधान लाभणार असल्याच्या त्यांच्या भविष्यवाणीमुळे महाराष्ट्रापेक्षा जास्त दिल्लीची उत्सुकता ताणली गेली आहे. पृथ्वीराजबाबा सहसा धाडसी विधाने किंवा गॉसिप करीत नाहीत. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागून देशाला मराठी पंतप्रधान लाभणार असल्याचे विधान त्यांनी नेमक्या कोणत्या माहितीच्या वा घडामोडीच्या आधारे केले, याचीच सर्वत्र विचारणा सुरू आहे. चव्हाण यांचे भाकीत खरे ठरले तर पात्र ठरणाऱ्या दोनपैकी कोणता मराठी नेता पंतप्रधान होईल, याचीही चर्चा सुरू आहे. पृथ्वीराजबाबांनी वर्तविलेले भविष्य खरे ठरणार नाही, असा ठाम विश्वास मोदींचे समर्थक व्यक्त करीत आहेत. पण गॉसिपप्रेमी दिल्लीच्या राजकीय वर्तुळाला या निमित्ताने खमंग विषय मिळाला आहे.


थेट-भेटीची गांधीगिरी (फोटो - जयराम रमेश, राजनाथ सिंह)
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सरकारी पैशाने बाबरी मशीद बांधू इच्छित होते. पण या प्रस्तावाचा सरदार वल्लभभाई पटेल यांनी विरोध केला होता, असे मणिबेन पटेल यांच्या पुस्तकाचा दाखला देत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आरोप केला. काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रभारी सरचिटणीस खासदार जयराम रमेश यांनी राजनाथ सिंह यांचे आरोप खोडून काढण्यासाठी त्यांची संसद भवन परिसरात सर्वांदेखत थेट भेट घेतली आणि मणीबेन पटेल यांच्या डायरीतील पाने भेट देऊन त्यातील मजकूर आवर्जून वाचावा, अशी नम्र विनंती केली. एकमेकांवर आक्रमकपणे आरोप-प्रत्यारोप आणि वार-पलटवार करण्याची एकही संधी न गमावणाऱ्या प्रतिस्पर्धी पक्षांमधील मतभेद मिटविण्यासाठी रमेश यांच्या गांधीगिरीमुळे तो मजकूर वाचण्याआधीच राजनाथ सिंह खजील झाले होते.


(या सदरासाठी सुनील चावके, अजय बुवा, सागर पाटील यांनी लेखन केले आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT