पुणे

दिग्विजयसिंह यांच्या मोदीस्तुतीवरून कॉंग्रेसमध्ये खळबळ

CD

दिग्विजयसिंह यांच्या मोदी स्तुतीवरून कॉंग्रेसमध्ये खळबळ
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता २७ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीआधी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप संघटनेची स्तुती करणारी पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. पक्षाच्या भूमिकेपेक्षा स्वतःचा वेगळा विचार मांडणाऱ्या शशी थरूर यांच्या मालिकेत आता दिग्विजयसिंह यांचा समावेश झाल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
दिग्विजय सिंह यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना फोटो शेअर ट्विट केला. या फोटोमध्ये लालकृष्ण अडवानी खुर्चीत तर नरेंद्र मोदी त्यांच्याजवळ खाली जमिनीवर बसलेले आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलेल्या या या फोटोसोबत दिग्विजय सिंह यांनी लिहिले आहे, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जमिनीवरचा स्वयंसेवक आणि भाजपचा जमिनीवरचा कार्यकर्ता खाली बसून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान झाला, हीच संघटनेची ताकद आहे. या पोस्टच्या शेवटी त्यांनी जय सियाराम म्हटले आहे. कॉंग्रेसची कार्यकारिणी बैठक पक्ष मुख्यालयात आज झाली. ‘मनरेगा’मधील बदलाच्या कायद्याला विरोध आणि अरावली पर्वतरांगांच्या संरक्षणावर कार्यकारिणी बैठकीत चर्चा होणार असताना दिग्विजयसिंह यांच्या या पोस्टमुळे खळबळ उडाली. या पोस्टद्वारे दिग्विजयसिंह यांनी अप्रत्यक्षपणे तळागाळात काम करणाऱ्या समर्पीत कार्यकर्त्यांचा आणि संघटनेत बदल करण्याचा सल्ला काँग्रेस नेतृत्वाला दिला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री राहिलेले दिग्विजयसिंह हे कॉंग्रेस संघटनेत दीर्घकाळ सरचिटणीस पदावर असून सध्या राज्यसभेत खासदार आहेत. त्यांची खासदारकी एप्रिल २०२६ मध्ये संपुष्टात येत आहे. याआधीही दिग्विजयसिंह यांनी मागील आठवड्यात १९ डिसेंबरला पक्षनेते राहुल गांधींना उद्देशून सोशल मीडियावर पोस्ट केली होती. सामाजिक-आर्थिक मुद्द्यांवर आपली मते पूर्णपणे अचूक आहेत. पण आता कृपया काँग्रेसकडेही लक्ष द्या. निवडणूक आयोगाप्रमाणेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसलाही सुधारणांची गरज आहे, असे म्हणत दिग्विजयसिंह यांनी राहुल गांधींना काँग्रेस संघटनेकडे लक्ष देण्याचे आवाहन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Political Breaking : बराटे, शिवरकर यांची भाजप मध्ये एन्ट्री; वानवडीमध्ये राजकीय ट्विस्ट!

Crime: तरुणीनं प्रियकराला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला; प्रेयसीला राग अनावर, क्रीडांगणात गाठलं अन्..., काय घडलं?

Dharashiv Agriculture : येरमाळ्याच्या तरुण शेतकऱ्याची कमाल; घरच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग करून इराक निर्यातीत यश!

Motor Vehicle Rules: दहा वर्षांची गाडी समजणार जुनी; 'फिटनेस फी' दहा पटींपर्यंत वाढली, केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा!

Indian Railway: सण-उत्सवात रेल्वेचा मोठा हातभार; वर्षभरात ४३ हजारांहून अधिक विशेष गाड्या!

SCROLL FOR NEXT