General Anil Chauhan

 

Sakal

पुणे

General Anil Chauhan : हवाई दलाचा वापर आता तणाव वाढविणारा नाही, अनिल चौहान; ‘रिव्हेली टू रिट्रीट’ आत्मचरित्राचे पुनःप्रकाशन

Operation Sindhur : ‘ऑपरेशन सिंदूर’ने हवाई दलाविषयीच्या पारंपरिक धारणा मोडीत काढत युद्धातील त्याची नवी भूमिका अधोरेखित केली असल्याचे मत सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘पूर्वी युद्धांमध्ये हवाई दलाचा वापर हा तणाव वाढविणारा असल्याचे मानले जात होते. मात्र, आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये त्याचा प्रत्यय आला,’’ असे मत भारताचे सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केले.

लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात यांच्या ‘रिव्हेली टू रिट्रीट’ आत्मचरित्राचे पुनःप्रकाशन चौहान यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमाला लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, लेफ्टनंट जनरल अनिंद्य सेनगुप्ता, लेखक शिवकुणाल वर्मा, थोरात यांचे सुपुत्र डॉ. यशवंत थोरात आणि स्नुषा उषा थोरात आदी उपस्थित होते.

‘‘थोरात यांनी भारतातच नाही; तर परदेशातही काम केले. आज जगातील सर्वाधिक संवेदनशील ठिकाणांपैकी एक असलेल्या कोरियातही त्यांनी काम केले. भौगोलिक आणि भूराजकीय परिस्थिती बदलल्याने त्यांच्या ‘फॉरवर्ड पॉलिसी’चे विश्‍लेषण आज करणे कठीण आहे. थोरात यांचे ‘रिव्हेली टू रिट्रीट’ पुस्तक केवळ आत्मचरित्र नाही; तर ते नेतृत्व आणि धोरणाचे चिंतन करताना पुढील पिढ्यांना शिकवण देणारे आहे,’’ असे गौरवोद्‍गार चौहान यांनी काढले.

‘‘स्वातंत्र्यपूर्व भारतातील सैन्य आणि स्वतंत्र भारतातील नव्याने निर्माण होणारे सैन्य, यातील दुवा होऊन त्यांना सांधण्याचे काम थोरात यांनी केले,’’ असे मत सेठ यांनी व्यक्त केले. ‘रिव्हेली टू रिट्रीट’ पुस्तकाच्या नव्या आवृत्तीत यापूर्वी प्रकाशित न झालेल्या शोधनिबंधांचा आणि छायाचित्रांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT