पुणे

फुरसुंगीतील महामार्गावर डांबरीकरण सुरू

CD

फुरसुंगी, ता. ११ : ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेत फुरसुंगीतील महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून ‘सकाळ’चे आभार व्यक्त केले आहे.
फुरसुंगीतील महामार्गाच्या दुरवस्थेबाबत ‘पालखी महामार्गावर खड्डे अन् कोंडी’ या शीर्षकाची ‘सकाळ’ने नुकतीच बातमी प्रसिद्ध केली होती. परतीच्या पावसाने रस्ता अक्षरशः वाहून गेला असून त्यावर दोन फुटापर्यंत खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात आलेला मुरूम पावसाने वाहून गेल्याने खड्डे पुन्हा मोकळे झाले आहेत. रस्त्याच्या कडा धोकादायक झाल्या आहेत. यामुळे येथील वाहतूक संथ होऊन नागरिकांना खड्ड्यांसोबत कोंडीचा सामना करावा लगत आहे. यावर उपाय म्हणून डांबरीकरण हा एकच पर्याय आहे, हे वास्तव या बातमीतून प्रशासनासमोर मांडण्यात आले होते. येथील परिस्थितीवर गांभीर्याने विचार करून प्रशासनाने येथील डांबरीकरणाला सुरवात केली आहे. त्यामुळे नागिरकांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्याने जीवन संपवलं; धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, कारण काय?

Latest Marathi News Live Update : शरद पवार गटाचे जयंत पाटील यांचा राम खाडे कुटुंबियांना फोन; प्रकृतीची विचारपूस करून योग्य कारवाईची ग्वाही

Croma sale : क्रोमाच्या Black Friday Sale मध्ये 50% वाली डिस्काउंट ऑफर! कोणत्या वस्तू मिळतायत अर्ध्या किंमतीत? पाहा एका क्लिकवर

CM Devendra Fadnavis : लाडकी बहीण बंद न करता एक कोटी बहीणींना लखपती बनवणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Bigg Boss Marathi: 'पारु' मालिकेतील 'ही' अभिनेत्री बिग बॉस मराठीमध्ये दिसणार? एक पोस्टमुळे रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT