पुणे

अर्पूण कामामुळे नागरिकांचे हाल घोले मार्ग ः धुळीमुळे आरोग्याला धोका, रस्ता लवकर करण्याची मागणी

CD

शिवाजीनगर, ता. २८ : घोले रस्ता नवीन बनवण्यासाठी जुना रस्ता मशिनने खरवडून काढला. दरम्यान, ड्रेनेज विभाग व पाणीपुरवठा विभाग यांच्या माध्यमातून दोन्ही लाईन टाकण्याचे काम सुरू झाले. मात्र काम वेळेत पूर्ण न झाल्याने रस्ता तसाच राहिला. त्यामुळे नवीन रस्ता बनवताना धुळीचे लोट तयार होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.

रस्त्याचे काम वेळेत न झाल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. तुकाराम महाराज पादुका चौक ते महात्मा फुले संग्रहालय हा रस्ता सध्या बनवला असून तिथून पुढे बालगंधर्व रंगमंदिरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम बाकी आहे.

रस्ता खाणून ठेवल्यामुळे धुळीचा त्रास होत आहे. मुले आजारी पडत आहेत. अजूनही काम पूर्ण न झाल्याने गाड्या चालवण्यासाठी त्रास होतो. काम लवकर पूर्ण करायला करावे.
- संदीप शेट्टी, रहिवासी, घोले रस्ता

रस्ता खाणून ठेवल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. लोकांच्या घरात धुरळा जात आहे. अनेक दिवस काम रखडले. रस्ता खडबडीत करून ठेवल्याने गाड्या चालवणे मुश्कील झाले आहे.
- श्याम हर्षे रहिवासी घोले रस्ता

ड्रेनेज लाईन आणि पाणीपुरवठा लाईनची दोन्ही कामे सुरू होती. तुकाराम महाराज पादुका चौकातून महात्मा फुले संग्रहालयपर्यंत रस्ता बनवल्यावर पाणीपुरवठा विभागाकडून आणि एका ठेकेदार कंपनीचे नागरिक येऊन दोन ठिकाणी पाइपलाइनचे काम करायचे आहे, असे सांगितले. म्हणून पुन्हा पुढील डांबरीकरण थांबवले. सध्या महात्मा फुले संग्रहालयपर्यंत काम झाले आहे. पुढील दोन दिवसांत पहिल्या थराचे काम पूर्ण होईल. नंतर तीन-चार दिवसांनी फायनल काम केलं जाईल. पाणीपुरवठा विभागाकडून वेळेत काम पूर्ण न झाल्याने रस्ता बनवण्यासाठी विलंब झाला.
- दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता, रस्ते विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT