पळसदेव, ता. २५ : पळसदेव (ता. इंदापूर) येथील पळसनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कलाविष्कार कार्यक्रमात विविध कला सादर करून उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकली. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांवर बक्षीसाचा वर्षाव केला. यावेळी सुमारे ५० हजारांहून अधिक रक्कम बक्षीसापोटी जमा झाली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक लोकगीते, पर्यावरण रक्षण संदेश, मोबाईलचे दुष्परिणाम, स्त्री जीवनाचे महत्त्व, हुंडाबळी आदी सामाजिक विषयांवर आधारित प्रबोधनपर नाटुकली सादर केली. याशिवाय एेतिहासिक गाण्यांसह शेतकरी नृत्य, पारंपारिक लावणी लोककला, कॉमेडी रिमिक्स गाणी, कोळी गीते, गोंधळ गीते, देशभक्तिपर गीतांवर नृत्यकला सादर केली. हिंदी-मराठी गाण्यांवर चिमुरड्यांनी केलेल्या नृत्यकलेला रसिक ग्रामस्थांनी दाद दिली. सुमारे पाच तास चाललेल्या कार्यक्रमास पालक ग्रामस्थांना रात्री उशिरापर्यंत खिळवून ठेवत, ५० हजारांहून अधिक रकमेची बक्षीसाची बिदागी पदरी पाडून घेण्यात विद्यार्थी कलाकार यशस्वी झाले.
बुधवारी (ता. २४) पळसनाथ विद्यालयात कलाविष्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सरपंच कोमल सुभाष बनसुडे यांच्याहस्ते दिपप्रवज्वलन करून कार्यक्रमास सुरवात केली. यावेळी कार्यक्रमास पळसनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगीराज काळे, संचालक राजेंद्र काळे, बबन काळे, सरपंच कोमल सुभाष बनसुडे, मेघराज पाटील, देविदास बांडे, संध्याराणी काळे, एकनाथ शेलार, हिराचंद काळे, हेमंत काळे, कर्मयोगीचे संचालक शांतिलाल शिंदे, प्राचार्य विकास पाठक, पर्यवेक्षक संजय जाधव यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपली संस्कृती व परंपरेची जाणीव व्हावी, त्यांच्यातील विविध सुप्त गुणांना वाव मिळावा, व्यासपीठ धिटाई (स्टेज डेअरिंग) वाढावी या उद्देशाने अशा कार्यक्रमाचे आयोजन महत्त्वाचे ठरते. पळसनाथ विद्यालयाच्या माध्यमातून सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडविण्यास प्राधान्य दिले जाते.
दरम्यान अंकुश ढुके यांनी विद्यालयासाठी २१ हजार रुपये देणगी दिली. संतोष पवार यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश शेलार यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.