पुणे

मलकापूर सहकार परिषदेचे उद्घाटन

CD

सहकारामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट

खासदार नितीन पाटील; मलकापुरात पश्चिम महाराष्ट्र चौथी सहकार परिषद

मलकापूर, ता. २७ : देशाची अर्थव्यवस्था ही ग्रामीण भागावर अवलंबून असते आणि ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम सहकार क्षेत्राने केले आहे. पतसंस्था, साखर कारखाना, जिल्हा मध्यवर्ती बँका व अर्बन बँका या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट बनली आहे. सहकार क्षेत्रामुळेच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे, असे प्रतिपादन खासदार नितीन पाटील यांनी केले.
येथील मळाई ग्रुप व कनिष्ठ महाविद्यालय अर्थशास्त्र राज्य विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्र चौथ्या सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्याचे उद्‍घाटन खासदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी श्री. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी होते. या वेळी शेती मित्र अशोकराव थोरात, कनिष्ठ महाविद्यालय अर्थशास्त्र राज्य विचारमंच प्रा. डॉ. शरद शेटे, विभागीय सहनिबंधक किरणसिंह पाटील, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था साताऱ्याचे संजयकुमार सुद्रिक, कऱ्हाडच्या उपनिबंधक अपर्णा यादव, कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष समीर जोशी, नगरसेविका डॉ. स्वाती थोरात, नगरसेवक भीमाशंकर माऊर, श्री मळाईदेवी पतसंस्थेचे अध्यक्ष अजित थोरात, अर्थशास्त्र राज्य विचारमंच समन्वयक प्रा. सतीश जंगम, प्रा. आर. डी. पाटील उपस्थित होते.
अशोकराव थोरात म्हणाले, ‘‘सहकार क्षेत्राची वास्तव वस्तुस्थिती व भविष्याबाबत प्रकट विचारविनिमय करून सहकार क्षेत्राला एक नवीन दिशा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या बदलत्या सहकार धोरणाबाबत पश्चिम महाराष्ट्र चौथी सहकार परिषद कऱ्हाड येथे आयोजित करण्यात आली आहे.’’
या वेळी प्रा. शेटे, श्री. जोशी, सुभाष दगडे आदींनी मार्गदर्शन केले. परिषदेचे नेटके नियोजन अर्थशास्त्र विचार मंच, सदस्य व मळाई ग्रुपमधील पतसंस्था व शिक्षण संस्थांचे सर्व प्रतिनिधी यांनी केले, तसेच संगीत शिक्षक शरद तांबवेकर व त्यांच्या वाद्यवृंद विभागांनी सहकार विषयीची विविध गीते सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. प्राध्यापक शीला पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आर. डी. पाटील यांनी आभार मानले.

-----------------------------

चौकट

अपप्रवृत्ती घातक

श्री. पाटील म्हणाले, ‘‘शेतकरी हा सधन बनला; परंतु अलीकडच्या काळामध्ये सहकार क्षेत्रामध्ये काही अपप्रवृत्ती येऊ घातल्या आहेत ज्या सहकाराला घातक बनवत आहेत. सर्वसामान्य लोकांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी व सहकार टिकवण्यासाठी या क्षेत्रामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्याकडे शासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.’’
.....................................
01145
मलकापूर : पश्चिम महाराष्ट्र चौथ्या सहकार परिषदेचे उद्‍घाटन करताना नितीन पाटील. समवेत सुभाषराव जोशी, अशोकराव थोरात, डॉ. शरद शेटे, किरणसिंह पाटील, संजयकुमार सुद्रिक, अपर्णा यादव, समीर जोशी आदी.

----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Food : भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

पहिलीपासून हिंदी भाषा! त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल मुदतीपूर्वी? अहवालात नेमकं काय?

``थ्रू ए डिप्लोमॅट्स लेन्स’’

Pakistani Terrorist: मोठी बातमी! ३० ते ३५ दहशतवादी लपून बसलेत; भारतीय लष्कराची शोधमोहीम सुरू, पण कुठे?

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

SCROLL FOR NEXT