पुणे

सांगोला आटपाडी भागाला वरदान ठरलेला बुद्धेहाळ तलाव.

CD

सांगोला तालुक्याला वरदान ठरलेला बुद्धेहाळ तलाव
.......
सांगोला तालुक्यातील पश्चिम भागातील चोपडी, बुद्धेहाळ, गौडवाडी, पाचेगाव (खु.), उदनवाडी, नाझरे व आटपाडी तालुक्यातील माडगुळे, शेटफळ आदी गावांना कॅनलमार्फत बुद्धेहाळ तलावामधून पाणीपुरवठा केला जातो. यामुळे बुद्धेहाळ तलाव हा सांगोला तालुक्यासह आटपाडी भागाला वरदान ठरलेला आहे.
................
- विनोद देशमुख, कोळा
..................
बुद्धेहाळ तलाव ब्रिटिशकालीन असून १९५७ साली पूर्ण होऊन सिंचनास सुरवात झाली. हा तलाव ६३३.६० हेक्टर जमीन संपादित करून उभारण्यात आला. हा मध्यम प्रकल्प असून टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग ओगलेवाडी यांच्या अंतर्गत येतो तसेच तलावास सांगोला तालुक्यातील शुक्राचार्य व सांगली जिल्ह्यातील पर्वतरांगामधून वाहून आलेल्या पाणलोट क्षेत्राचा फायदा होतो.
बुद्धेहाळ तलावाचा पाणीसाठा ३२.०५ दलघमी असून त्याचा उपयुक्त जलसाठा १४.९३ दलघमी आहे तर निरुपयोगी जलसाठा ०४.१० दलघमी आहे. तलावाची उंची १८.५२ मीटर व लांबी २५६० मीटर आहे. या तलावाची पाणी वितरण व्यवस्था चांगली आहे. पाटबंधारा कायदा २००५ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या १७ पाणी वापर संस्थाकडून वितरण होत आहे. या प्रकल्पाचे काम होऊन ६४ वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्य कालवा, वितरिका व उपवितरिकाचे छेद विस्कळित झाले आहेत. सध्या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून पाणी साठवण क्षमता कमी होत चालली आहे. याचबरोबर बुद्धेहाळ हा भव्य जलाशय व निरव शांतता, विविध प्रकारच्या पक्षांना नेहमी आकर्षित करत असते. तलावावर वेस्टर्न मार्श हॅरियर म्हणजेच युरेशियन दलदली ससाणा, पायमोज वटवट्या तसेच वेगवेगळ्या रंगाच्या चिमण्या व दुर्मिळ तसेच आकाराने मोठ्या असलेल्या शिकारी पक्ष्यांचे दर्शन झाल्याने पक्षीप्रेमी व वन्यजीव छायाचित्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बुद्धेहाळ तलाव परिसर येथील निसर्ग उंच झाडे, तलावाचे तटबंदी ब्रिटिशकालीन बांधकाम असलेला बंगला (गेस्ट हाउस) यामुळे पक्षी व वन्यजीवांसाठी माहेरघर आहे . सध्या युरेशियन दलदली ससाणा या हिवाळी पाहुणा असणाऱ्या परदेशी शिकारी पक्षांचे दर्शन घडत आहे. बुद्धेहाळ तलाव हा पाणलोट क्षेत्राबरोबर पक्षी व वन्यजीवांसाठी माहेरघर बनले आहे. या ठिकाणी पर्यटन केंद्र निर्माण करून यामध्ये जलाशय सफर, बेटिंग, पक्षी संग्रहालय असे उभे करून या भागाचा कायापालट केला तर या भागाची ओळख सर्वांना होईल.

फोटो:-
१) बुद्धेहाळ ता. सांगोला येथील तलावाचे विहंगम दृश्य.
२) युरेशियन दलदली ससाणा पक्षी.
३) पायमोज वटवट्या पक्षी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VVMC Election: मनसे-बविआ युतीमुळे गणित बदललं; उद्धव ठाकरे एकटेच लढणार? ११५ जागांची लढाई रंगणार

Shocking : क्रिकेटच्या सामन्यापूर्वी प्रशिक्षकाचा मृत्यू; खेळाडू मैदानावर उतरणारच होते, तितक्यात घडला धक्कादायक प्रकार

BMC Election: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची बीएमसी निवडणुकीत एन्ट्री? दोन्ही मुलींकडून वडिलांसोबत अर्ज दाखल; कोणत्या जागेवरून लढणार?

Marathi Weekly Tarot Horoscope: लक्ष्मी योगामुळे वृषभ, मिथुन, कर्कसह 5 राशींना मिळणार मोठा आर्थिक लाभ; वाचा साप्ताहिक टॅरो राशिभविष्य

Stock Market Holiday : NSE कडून 2026 साठी सुट्ट्यांची यादी जाहीर; 15 दिवस शेअर बाजार बंद! 1 जानेवारीला बाजार सुरू राहणार?

SCROLL FOR NEXT