पुणे

व्यापारी गाळ्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांकडून सहा महिन्यांपासून पोलिस बंदोबस्त मिळाला नाही

CD

माढ्यातील अतिक्रमणाची
प्रक्रिया थांबल्याने तीव्र नाराजी
.................
माढा, ता. २७ : माढा नगरपंचायतीच्या माढा-सोलापूर व माढा-वैराग रस्त्यालगत असणाऱ्या व्यापारी गाळ्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी माढा पोलिसांकडे पोलिस संरक्षणाची मागणी सहा महिन्यांपासून प्रलंबित असल्याने अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया थांबल्याने नगराध्यक्षा मीनल साठे व मुख्याधिकारी नेहा कंठे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
याबाबत साठे व कंठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवीन व्यापारी गाळ्यांच्या बांधकामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येथील गाळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून या ठिकाणी एक कोटी रुपयांत वीस गाळे व त्या गाळ्यावर दोन मजली शॉपिंग सेंटर उभे करून नवव्यवसायिकांना संधी देण्याचे नगरपंचायतीचे नियोजन आहे. येथे असलेले अतिक्रमण काढताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिस संरक्षण असावे म्हणून माढा पोलिसांकडे सर्व कागदपत्रांसह बंदोबस्ताची मागणी केली. मात्र सहा महिन्यांपासून पोलिसांकडून परवानगी मिळाली नसल्याने पोलिस अधीक्षकांची भेट घेतली असता माढा पोलिसांनी पोलिस उपअधिक्षक कार्यालयाकडे याबाबत नकारात्मक अहवाल पाठविल्याने बंदोबस्त दिला नसल्याचे समजले. याबाबत पोलिस उपनिरीक्षक नेताजी बंडगर यांनी या अहवाल पाठवण्यामागे कोणतेही राजकारण नाही. मी दोन दिवसांत दिलेला रिपोर्ट मागवून घेऊन पाहतो व नगरप़ंचायतीने दिलेली सर्व कागदपत्रे जोडून वरिष्ठ कार्यालयास पाठवतो असे सांगितले. यावेळी उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे, नगरसेवक नितीन साठे, आजिनाथ माळी, रेश्मा लंकेश्वर, विकास साठे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Alphonso mango : रत्नागिरी हापूस आता एआय तंत्रज्ञानावर; मोबाईल ॲपवरून बागेचे व्यवस्थापन होणार, हापूस शेतीत डिजिटल क्रांती

'चला हवा येऊ द्या' मध्येपण तेच काम करायचं होतं तर पुन्हा हास्यजत्रेत का नाही गेलास? गौरव मोरे म्हणतो- अरे तुम्ही लोक...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक सुरू

परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर, तर काँग्रेसचा उपमहापौर

Bhagat Singh Koshyari : "राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत"; भगतसिंह कोश्यारींचा राज ठाकरेंना खोचक टोला

SCROLL FOR NEXT