पुणे

वेण्णा लेक पर्यायी रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात महाबळेश्वरमधील वाहतूक कोंडीला दिलासा मिळणार

CD

वेण्‍णालेकच्‍या पर्यायी रस्‍त्‍याचा श्रीगणेशा

अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्‍‍न; वाहतूक कोंडी सुटण्‍यास मिळणार मदत

महाबळेश्‍‍वर, ता. २९ : येथील वेण्णा लेक परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पर्यायी रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात वेण्णा तलावाशेजारील सांडव्याच्या बाजूने उभारण्यात येणाऱ्या कमानी पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या रस्त्यामुळे वेण्णा लेक परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याने नागरिक व पर्यटकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
वनविभागाच्या परवानगी अभावी या रस्त्याचे काम रखडले होते. मात्र मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर अखेर हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा पर्यायी रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
महाबळेश्वर हे पर्यटकांचे आवडते थंड हवेचे ठिकाण असून, विविध हंगामात लाखो पर्यटक येथे दाखल होतात. पाचगणी- महाबळेश्वर हा मुख्य मार्ग आणि वेण्णा लेक परिसरात पर्यटकांची मोठी वर्दळ असते. सध्या शहरात प्रवेश व बाहेर पडण्‍यासाठी एकाच रस्त्याचा वापर होत असल्याने वेण्णा लेक परिसरात कायमस्वरूपी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
वेण्णा लेकाच्या बाजूने धनगरवाडामार्गे हा पर्यायी रस्ता क्षेत्र महाबळेश्वरला जाणाऱ्या मुख्य रस्त्याला जोडण्यात येणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर महाबळेश्वरमधून बाहेर पडण्यासाठी पर्यटक व स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

................................................

पूलही ठरणार प्रेक्षणीय पॉइंट
येथे साकारल्‍या जाणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूला पर्यटकांना फिरण्यासाठी पदपथ होणार आहे, तसेच पर्यटकांना याठिकाणी प्रेक्षणीय वेण्णा लेकसह जंगलाचे विहंगम दृश्य पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा पूल केवळ वाहतूक व्यवस्थेला दिलासा देण्‍याबरोबरच पर्यटकांनाही एक प्रेक्षणीय ठिकाण म्हणून आकर्षित करणारा ठरणार आहे.

................................................

वनविभाग, जीवन प्राधिकरणासह सर्व शासकीय आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्‍या आहेत. शासनाकडून सुमारे २५ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने वेण्णा लेक बाह्य रस्ता व कमानी पुलाचे काम हाती घेतले आहे. हे कामे जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत.
- अजय देशपांडे,
सार्वजनिक बांधकाम विभाग, महाबळेश्वर
...........................................
फोटो :........MHB25B04878
महाबळेश्‍‍वर : पुलाचे नियोजित चित्र.
फोटो :....... MHB25B04879
महाबळेश्‍‍वर : सुरू झालेले काम. (अभिजित खुरासणे : सकाळ छायाचित्रसेवा)
..........................................

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

Saptashrungi Temple : वणी साप्तश्रृंगी गडावर श्री भगवती मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले; भाविकांची गर्दी लक्षात घेता विशेष व्यवस्था!

Latest Marathi News Live Update : - अखेर किशोरी पेडणेकरांना उमेदवारी जाहीर

Hindu Homes Set on Fire in Bangladesh: बांगलादेशात हिंदू नागरिकांना कोंडून बाहेरून घरांना लावली आग; भयानक घटनेचा व्हिडिओ आला समोर

BMC Election: महायुतीत नाराजी स्फोट! शिंदे गटात राजीनाम्यांची मालिका, भाजपमध्येही समाज माध्यमावर खदखद

SCROLL FOR NEXT