सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ : आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी लढा देत कारावास भोगलेल्या व्यक्तींना सन्मानपूर्वक मदत देण्याच्या राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारी व फेब्रुवारी २०२६ या कालावधीसाठी पात्र ३८१३ आणीबाणी धारकांना एकूण २१ कोटी २० लाख ७६ हजार ८०३ रुपये इतके मानधन वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने २२ डिसेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, कारावासाच्या कालावधीनुसार लाभार्थ्यांना दरमहा २० हजार, १० हजार व ५ हजार रुपये या दराने मानधन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांसाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक आधार मिळणार आहे.
राज्याच्या सामाजिक सुरक्षा व कल्याण या लेखाशीर्षाखाली या योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून, जिल्हानिहाय निधी वितरणाचे स्पष्ट नियोजन करण्यात आले आहे. पुणे, नागपूर, जळगाव, बुलडाणा, नाशिक यांसह सर्व जिल्ह्यांना त्यांच्या लाभार्थी संख्येनुसार निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मानधन तत्काळ अदा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, वितरणाचा अहवाल शासनाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, २७ जून २०२५ पासून वाढीव मानधन लागू करण्यात आले असून, त्यानुसार सुधारित दराने रक्कम वितरित केली जाणार आहे. या निर्णयामुळे आणीबाणीतील संघर्षकऱ्यांच्या सन्मानाला पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले असून, शासनाच्या या पावलाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
जिल्हानिहाय आणीबाणी लाभार्थी व अनुदान (जानेवारी-फेब्रुवारी २०२६)
अ.क्र. जिल्ह्याचे नाव लाभार्थी संख्या मंजूर अनुदान ()
१ मुंबई शहर ३९ ३१,६६,६६७
२ मुंबई उपनगर ११७ ७२,४४,४०३
३ ठाणे १२६ ५४,८३,११०
४ पालघर ११२ ५१,९२,०७४
५ रायगड ४० २३,९४,०००
६ रत्नागिरी ७० ४६,५६,६६७
७ सिंधुदुर्ग ४३ २५,४०,०००
८ नाशिक ७८ ३९,१५,३३४
९ जळगाव १७४ १,०४,४०,०००
१० धुळे ३५ १८,८६,२२२
११ नंदुरबार २९ १३,१९,७७४
१२ अहिल्यानगर १३३ ६५,८७,२२२
१३ पुणे ५०४ ३,३९,२८,२२२
१४ सातारा ६३ २५,५९,७१४
१५ सांगली ८२ ४४,१४,६६८
१६ सोलापूर ६२ ३६,७८,३३४
१७ कोल्हापूर ७६ ३६,४०,०००
१८ छत्रपती संभाजीनगर १४७ ७१,२८,६६७
१९ जालना ५६ २१,८०,०००
२० बीड ५६ ३६,९४,०००
२१ नांदेड १०३ ४५,२१,०००
२२ हिंगोली १४८ ८२,३०,०००
२३ परभणी ३१ १८,२५,०००
२४ लातूर १०६ ५८,६३,२६२
२५ धाराशीव २७ १३,६०,०००
२६ अमरावती ८३ ४६,१०,६९१
२७ बुलडाणा ४४७ १,९१,३१,३२६
२८ यवतमाळ ६९ ३६,६६,६६७
२९ अकोला ८९ ४५,१३,३३४
३० वाशीम ९० ६,३०,८८६
३१ नागपूर ३९९ २,७१,००,०००
३२ वर्धा ११४ ७२,८०,०००
३३ भंडारा २५ १३,८९,३३४
३४ गोंदिया २१ ११,६९,०००
३५ चंद्रपूर ९९ ४७,३७,२२५
एकूण ३८१३ २१,२०,७६,८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.