pune crime update accused arrested terror in city esakal
पुणे

Pune Crime : कोथरूड परिसरात दहशत पसरविणाऱ्या आरोपीला अटक

धर्मवीर प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष अक्षय गायकवाड (वय २२ रा. शास्त्रीनगर) यांनी या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बॅनरवर छायाचित्र न लावल्यामुळे कोथरूड परिसरात तलवार फिरवत दहशत पसरविणाऱ्या ओंकार ऊर्फ आबा शंकर कुडले (रा. सागर कॉलनी, कोथरूड) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

धर्मवीर प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष अक्षय गायकवाड (वय २२ रा. शास्त्रीनगर) यांनी या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून कुडले याच्यासह साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी कुडलेचा साथीदार अशोक कळजकर या संशयितालाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिष्ठानच्या वतीने शास्त्रीनगर परिसरात एक ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

येथे आरोपींनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. कुडले आणि त्याचा साथीदार त्यादिवसापासून फरार होते. दरम्यान, दोघे आरोपी पवना धरणाच्या परिसरात डोंगराळ भागात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे,

सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर हे पथकासह पवना धरण परिसरात रवाना झाले. त्यांनी तेथून कुडले आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात आला छोटा डॉन

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

BBM 6 UPDATE:'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का

SCROLL FOR NEXT