पुणे

विकास करण्यासाठी भरपूर वाव

CD

प्रभाग १० : बावधन-भुसारी कॉलनी
कोथरूड, ता. १९ : कोथरूड, खडकवासला, मुळशी-भोर-वेल्हा विधानसभा आणि बारामती व पुणे लोकसभा मतदारसंघात बावधन-भुसारी कॉलनी प्रभाग विभागलेला आहे. चांदणी चौकातून जाणारा महामार्ग, येऊ घातलेला मेट्रो मार्ग, वन व बीडीपी क्षेत्रामुळे जैवविविधतेने संपन्न असलेल्या भागाची पार्श्वभूमी, महापालिकेला विकासासाठी मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध असूनही या भागाचा अपेक्षित झाला नाही, अशी येथील नागरिकांची भावना आहे.
स्मार्ट विकास करण्यासाठी बावधन, भुसारी कॉलनीचा परिसर हा प्रयोगशाळा म्हणून उपयोगात आणता आला असता. परंतु पायाभूत सुविधांचा अभाव, चुकीच्या व अर्धवट विकासकामांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाणीटंचाई, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अंतर्गत सार्वजनिक वाहतूक सुविधेचा अभाव, अरुंद व नादुरूस्त रस्ते व कचऱ्याची समस्या या प्रभागात जाणवते.

चतु:सीमा :
पूर्व : वनाज मेट्रो डेपोच्या पश्चिमेकडील हद्दीने (कोथरूड कचरा डेपो) पौड रस्त्यास मिळेपर्यंत, नानासाहेब धर्माधिकारी पथास कोथरूड पोलिस ठाण्याजवळ अण्णा भाऊ साठे चौकात मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस नानासाहेब धर्माधिकारी पथाने कोथरूड डी. पी. रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस कोथरूड डी. पी. रस्त्याने बिरुजी मोकाटे चौकामध्ये श्रीकांत ठाकरे पथास मिळेपर्यंत.
- पश्चिम : बावधन खुर्द व वारजेमधील हद्द जेथे भूगावच्या हद्दीस मिळते तेथून बावधन बुद्रूक व लवळेच्या हद्दीने सूसच्या हद्दीस (महापालिका हद्दीस) मिळेपर्यंत.
- उत्तर : बावधन बुद्रूक व बावधन खुर्द
- दक्षिण : श्रीकांत ठाकरे पथ ते गोपीनाथनगर

समाविष्ट भाग :
बावधन बुद्रूक, बावधन खुर्द, रामनगर, पाटीलनगर, एकलव्य कॉलेज, उजवी व डावी भुसारी कॉलनी, गुरुगणेशनगर, सागर कॉलनी, महात्मा सोसायटी, चांदणी चौक, वेदभवन जिजाईनगरी, प्रथमेश सोसायटी, इंदिरा शंकर नगरी, शास्रीनगरचा काही भाग.

कुठे? काय?
- चांदणी चौक परिसरात सेवा रस्ते करण्याची गरज. नैसर्गिक जलस्रोतांचे मार्ग अडल्यामुळे रस्त्यावर पाणी येते. पादचारी मार्ग आवश्यक.
- रामनदीत येणारे सांडपाणी रोखणे. कचरा टाकणाऱ्यांना प्रतिबंध करणे आवश्यक.
- आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्केटिंग ग्राउंडचे काम निष्क्रियतेमुळे अर्धवट राहिले आहे.
- बावधनमधील बीडीपी क्षेत्राबाबत निर्णय प्रलंबित असल्याने त्या क्षेत्राचा विकास रखडला.
- बावधनमधील बंद पडलेला बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित करावा.
- मोकळ्या जागेवरील अतिक्रमणे हटवून तेथे क्रीडांगण, शाळा, रुग्णालये बांधण्याची गरज.
- बावधनमधील नैसर्गिक झऱ्याची जागा ताब्यात घेऊन विकास करणे.
- पुनर्विकास करण्यात येत असलेल्या सोसायट्यांचा प्रश्न. विकासकामांतील अनियमितता तपासणे.
- अवैध बांधकामे, पदपथावरील अतिक्रमणे हटविणे, स्थानिक वाहतूक सुरळीत करणे तसेच तीव्र उतारामुळे पावसाळ्यात पाणी येणाऱ्या भागाची समस्या दूर करण्याची आवश्यकता.
- अनधिकृत नळजोड, अवैध बांधकामे, टेकडीफोड, गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त.

प्रमुख समस्या :
- अपुरा पाणीपुरवठा : बावधनमधील स्टारगेझ सोसायटीला पाण्यासाठी दर महिन्याला पाच लाख रुपये खर्च येतो. ‘भरमसाट कर वसुल करणारी महापालिका आम्हाला पुरेसे पाणी देत नाही,’ अशी बावधन खुर्द, बावधन बुद्रूक येथील अनेक सोसायट्यांची तक्रार आहे. भुजबळ टाऊनशिप परिसरासाठी स्वतंत्र जलकुंभ बांधण्याची गरज.
- प्रदूषण : बावधनमधील ७ रेडी मिक्स कॉंक्रिट प्लांटमुळे होणारे
प्रदूषण रहिवाशांना त्रासदायक ठरत आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही.
- वाहतूक कोंडी : अण्णा भाऊ साठे चौक ते कोथरूड डेपो, शांतिबन ते एकलव्य कॉलेज, बावधन जुना जकात नाका ते मेरीगोल्ड चौक,
चेलाराम हॉस्पिटल परिसरात अवजड वाहतूक व भरधाव वाहनचालकांमुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव धोक्यात.
- कचरा : कोथरूड कचरा डेपो हलविण्याची गरज. कचरा संकलन, वर्गीकरणासाठी पर्यायी व सक्षम व्यवस्था तसेच जागेची उपलब्धता करण्याची गरज. नव्याने समाविष्ट भागात असलेल्या सोसायट्यांना अजूनही कचरा विल्हेवाटीसाठी वेगळा पैसा खर्च करावा लागतो.
- खंडित वीजपुरवठा : सदोष वितरण केंद्र (डीपी), उघड्या तारा, वारंवार केल्या जाणाऱ्या खोदकामामुळे तारा तुटणे आदींमुळे बावधन व भुसारी कॉलनी परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो.
- मैदाने, उद्यानांचा अभाव : खेळण्या-बागडण्यासाठी पुरेशी मैदाने, उद्याने व सायकल मार्ग हवा.
- रस्त्यावर बाजार : महापालिकेची भाजी मंडई नाही. रस्त्यावर अनधिकृत मंडई भरते. मैदानावर आठवडे बाजार होतात.

असे आहेत मतदार
एकूण लोकसंख्या : ८०,७३७
पुरुष : ४२,०८२
महिला : ३८,६४९
तृतीयपंथी : ६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA. 5th T20I: भारताने जिंकली मालिका! आधी हार्दिक-तिलकने चोपलं अन् मग चक्रवर्तीने फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेला अडकवलं

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Car Loan: नवीन कार घेणार असाल तर खुशखबर! 'या' बँका देत आहेत कार कर्जावर सर्वात कमी व्याजदर, एकदा यादी पाहाच!

बनावट दारु विक्री! देशी-विदेशी दारू, हातभट्टी अन्‌ विविध विदेशी ब्रॅंडची बनावट टोपणे जप्त; सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची कारवाई

Kidney Trafficking Racket: धक्कादायक! केवळ रोशन कुडेनेच नव्हे, तर आणखी चार युवकांनीही विकली किडनी

SCROLL FOR NEXT