पुणे

झुबेरचे दहशतवादी मनसुबे उघडकीस

CD

पुणे, ता. १६ : राज्य दहशतवादी विरोधी पथकाच्या (एटीएस) ९ ऑक्टोबर रोजी टाकलेल्या छाप्यात पुण्यातील एका तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंत्याचे धक्कादायक मनसुबे उघडकीस आले आहेत. मागील १५ वर्षांहून अधिक काळ पुण्यातील नामांकित आयटी कंपन्यांत काम करणाऱ्या अल कायदाशी संबंधित संशयित झुबेर हंगरगीकर या अभियंत्याकडे अल-कायदासह कट्टरवादाचे साहित्य, बॉम्बनिर्मितीचे मार्गदर्शक आणि ‘जिहाद’ प्रशिक्षणाची पुस्तके आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

‘एटीएस’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झुबेरने सोलापूर येथील एका नामांकित इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून बी.ई. पदवी घेतली आहे. प्राथमिक शिक्षण सोलापूर येथील एका उर्दू हायस्कूलमध्ये झाले. त्याने प्रथम हिंजवडी येथे एका नामांकित आयटी कंपनीत काम केले, तर २०१२ पासून तो कल्याणीनगर येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करीत होता. कोविडनंतर तो घरून आणि कार्यालयातून काम करत होता.

तांत्रिक क्षेत्रातील अनुभव असूनही त्याची धार्मिक अतिरेकी विचारसरणीकडे झुकलेली वृत्ती चिंताजनक असल्याचे तपासात समोर आले. कुटुंबात कट्टर धार्मिकवादाची कठोर अंमलबजावणी, लोकशाहीविरोधी मतप्रचार आणि युवकांना लोकशाही बहिष्काराचे आवाहन तो सातत्याने करीत होता. २०१५ च्या सुमारास त्याचा संपर्क पुणे आणि हैदराबादमधील संशयित अतिरेकी घटकांशी आला. त्यानंतर त्याने मध्यपूर्व, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील कट्टर प्रवक्त्यांचे साहित्य वाचण्यास सुरुवात केली. हळूहळू अशा पुस्तकांचा मोठा संग्रह तयार केला आणि इंटरनेटवरूनही मोठ्या प्रमाणात अतिरेकी माहिती गोळा केली.
नऊ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र एटीएसने कोंढवा, खडकी, वानवडी परिसरात छापेमारी करून १८ जणांची तपासणी केली होती. जप्त करण्यात आलेल्या साहित्याच्या फॉरेन्सिक विश्लेषणात अत्यंत धोकादायक अतिरेकी साहित्याचा साठा आढळून आला आहे, असे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. झुबेर याची पोलिस कोठडीत सुमारे महिनाभर एटीएसकडून चौकशी करण्यात आली. सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
---------------
हिंसक जिहादद्वारे ‘खिलाफत’ स्थापनेचे आवाहन
झुबेरच्या लॅपटॉप व मोबाईलमधून अल-कायदाची अनेक डिजिटल मासिके मिळाली. या मासिकांत जिहाद, शहादत, ‘लोन-वुल्फ’ हल्ले, गनिमी तंत्र आणि बॉम्ब तयार करण्याच्या पद्धती अशा माहितीचा प्रचंड साठा आहे. भारतात हिंसक जिहादद्वारे ‘खिलाफत’ स्थापनेचे उघड आवाहन या साहित्यामध्ये आढळले. त्याने अल-कायदाची पुस्तके, मध्यपूर्वेतील कट्टर लेखन आणि ९/११सारख्या हल्ल्यांचा अभ्यास केलेला असल्याचेही तपासात दिसून आले. मुजाहिदीन व शहीद अशा घटनांना प्रोत्साहन देणारे साहित्य त्याने व्यापक प्रमाणात वाचले होते. आईडी, स्फोटके, गनिमी युद्ध यावरील प्रशिक्षण मॅन्युअल्सचे त्याला चांगले ज्ञान असल्याचे फॉरेन्सिक विश्लेषणात समोर आले आहे. ही बाब सुरक्षा यंत्रणेसाठी अत्यंत गंभीर मानली जात आहे.
-------------------
पुणे, सोलापूर, ठाण्यात गुप्त कारवाया
झुबेर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सोशल मीडिया ग्रुपचा सक्रिय सदस्य होता. स्वतःचेही गट तयार करून त्यातून युवकांमध्ये ‘गजवा-ए-हिंद’, ‘शरीयत राज’, ‘खिलाफत स्थापने’चे संदेश तो प्रसारित करीत होता. लोकशाहीविरोधी चर्चेसोबत राष्ट्रीय सीमांच्या निर्मूलनाची कल्पनाही या गटांत मांडली जात होती. पुणे, सोलापूर व ठाणे येथे त्याने अनेक वेळा गुप्त कारवायाचे आयोजन केले. या सत्रांत तो युवकांना भारतात शरीयत स्थापन करण्याचा एकमेव मार्ग ‘जिहाद’च असल्याचा प्रचार करीत होता, असे तपासात स्पष्ट झाले आहे.


-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways : पुणे, मुंबई, कोल्हापूरहून धावणाऱ्या 8 एक्स्प्रेस गाड्यांना जानेवारी 2026 पासून मिळणार 'LHB' डबे

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Mumbai Crime: मध्यरात्री फिरताना २७ वर्षीय फ्रेंच तरुणीसोबत तरूणानं नको ते कृत्य केलं अन्...; मुंबईत नेमकं काय घडलं?

VIP Mobile Number Process : घरबसल्या तुम्हाला मिळेल VIP मोबाईल नंबर; 10 मिनिटात कन्फर्म फ्री रजिस्ट्रेशन, सीक्रेट ट्रिक पाहा

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

SCROLL FOR NEXT