पुणे

कुचेकरसह टोळीतील आठ जणांवर मोका

CD

पुणे, ता. ३० : नाना पेठेतील राजेवाडी परिसरात एका तरुणाचा खून करून दहशत पसरविणाऱ्या सुशांत ऊर्फ मट्या शशिकांत कुचेकर याच्यासह टोळीतील आठजणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली. त्यामध्ये एका महिलेसह अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
टोळीप्रमुख सुशांत ऊर्फ मट्या शशिकांत कुचेकर (वय २८, रा. नाना पेठ, राजेवाडी), आदित्य राजू केंजळे (वय १८, रा. खडक चौक, धायरी), स्वरूप संतोष गायकवाड (वय १८, रा. गुरुवार पेठ), राजन अरुण काऊंटर (वय २३, रा. राजेवाडी, नाना पेठ), तेजस अशोक जावळे (वय ३२, रा. नाना पेठ), अतिष अनिल फाळके (वय २७, रा. नाना पेठ) यांच्यासह एक ४४ वर्षीय महिलेस अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी राजेवाडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करून आणि विटांनी मारहाण करून खून केला होता. ही घटना २३ नोव्हेंबर २०२२ रोजी घडली होती.
यासंदर्भात समर्थ ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्यामार्फत मोकाची कारवाई करण्याबाबत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यांनी या प्रकरणाची छाननी करून कारवाईस मान्यता दिली. फरासखाना विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

फोनवर बोलण्यात तरुणी एवढी मग्न होती की.. विषारी फूल खाल्ल्याने तडफडून झाला मृत्यू

Kolhapur Crime : राधानगरी तालुक्यात मुलाने वडिलांचा गळा आवळून केला खून; घरगुती वादातून उचललं टोकाचं पाऊल

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

SCROLL FOR NEXT