पुणे

‘नाशिक’मध्ये सर्वपक्षीय हाय होल्टेज ड्रामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पत्रकार परिषदेत आरोप

CD

पुणे, ता. ४ : नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. ‘‘हा सर्वपक्षीय हाय होल्टेज ड्रामा होता. तांबे हे काही ओरडले तरी बोललेच पाहिजे असे काही नाही. त्यांच्यावर आमचे प्रवक्ते बोलतील, त्यांच्या बोलण्यातून समाधान झाले नाही, तर मी बोलतो माझ्याकडे भरपूर मसाला आहे,’’ असे आव्हान नाना पटोले यांनी दिले.

तांबे यांनी पदवीधर निवडणूक झाल्यानंतर माझी भूमिका मांडणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सर्व घटनाक्रम सांगत पटोले यांच्यावर आरोप केले. खडकवासला येथे महिला आघाडीच्या बैठकीसाठी पटोले शनिवारी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पटोले म्हणाले, ‘‘तांबे यांच्याबाबत प्रवक्ते बोलतील. योग्य वेळी योग्य उत्तर द्यावं लागतं. काही ओरडलं काही बोललं तर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिलीच पाहिजे, असं गोदी मीडियाला सांगितलं असेल तर मला माहिती नाही. विखे-पाटील यांच्याबद्दल मी काही दिवसानंतर पद्धतशीर बोलणार आहे. माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांची जागा विखे घेऊ पाहत आहेत. अजित पवार यांनी घरातील भांडण चव्हाट्यावर आणले आहेत. त्यांनी आमच्या पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. ते महाविकास आघाडीत असूनही त्यांनी तांबे यांना मतदान केल्याचे ते सांगत आहेत.’’

काँग्रेस पक्षासमोर महागाई, अदानी, एलआयसी बँका लुटल्या जात आहेत, लोकांच्या कामाचा पैसा लुटला जात आहे, बेरोजगारी, शेतकऱ्यांची आत्महत्या हे महत्त्वाचे प्रश्‍न आहेत. ६ तारखेला आम्ही मोठे आंदोलन करणार आहोत, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले. दरम्यान, तांबे यांच्या आरोपांवर पत्रकारांनी वारंवार प्रश्‍न विचारल्याने त्यांनी माध्यमांवर आगपाखड केली.

वापरून फेकून देणे भाजपची नियत
गरज संपली की फेकून देणे ही भाजपची नियत आहे. मुक्ताताई आजारी असताना मतदानाला यायच्या, त्यांचे पती त्यांच्याबरोबर यायचे. एवढ्या निष्ठावंताला वेळेवर डावलणे बरोबर नाही, अशी शब्दांत कसब्यातून शैलेश टिळक यांना डावलल्याबाबत पटोले यांनी टीका केली. तसेच, काँग्रेसने अजून कोणालाही उमेदवारी घोषित केलेली नाही. पक्षाच्या वतीने सर्व्हे करण्यात आलेला आहे. त्याचा अहवाल हायकमांडला पाठवलाय त्या आधारावर उद्या रात्रीपर्यंत निर्णय येईल, असेही पटोले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT