पुणे

ऑन्कोप्लास्टिक शस्त्रक्रिया स्तनाच्या कर्करोगावर प्रभावी

CD

पुणे, ता. ८ : स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारामध्ये ‘ऑन्कोप्लास्टिक’ शस्त्रक्रिया ही सर्वोत्तम पर्याय आहे. ऑन्कोप्लास्टिकमध्ये स्तनाच्या कर्करोग असणाऱ्या रुग्णांवर कर्करोगाच्या शस्त्रक्रियेसह प्लास्टिक सर्जरीचाही वापर केला जातो. या प्रक्रियेचा वापर करून स्तनाच्या कर्करोगामध्ये रुग्णांचा स्तन वाचविण्यात येऊ शकतो, असे मत कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. सी. बी. कोप्पीकर यांनी मांडले.

‘इंटरनॅशनल स्कूल ऑफ ऑन्कोप्लास्टिक सर्जरी‘ने (आयएसओएस) ब्रेस्टग्लोबल, जहांगीर हॉस्पिटल आणि युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिया, युनायटेड किंगडम यांच्यातर्फे आयोजित ब्रेस्ट ऑन्कोलॉजीवरील कार्यशाळेत ते बोलत होते. डॉ. कोप्पीकर म्हणाले, ‘‘ प्लास्टिक सर्जरी ही स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये उत्कृष्ट कॉस्मेटिक परिणाम निश्चित दिसतो. शिवाय प्लास्टिक सर्जरीमुळे कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर महिलांची त्यांच्या शरीराबद्दलची प्रतिमा, आत्मसन्मान आणि जीवनाची गुणवत्ता अबाधित राहते. तसेच काही संशोधनांमध्ये असेही आढळून आले की ज्या स्त्रियांवर ऑन्कोप्लास्टिक शस्त्रक्रियेने उपचार केले गेले आहेत त्यांच्यामध्ये कर्करोगातून बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.’’ या कार्यशाळा व परिषदेत ऑस्ट्रेलिया, इजिप्त, युरोप, इंग्लंड तसेच भारतातील विविध शहरांमधील दोनशेहून अधिक शल्यचिकित्सकांनी भाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar : जागावाटपाचा तिढा सुटेना, नेत्यानं दोन पक्षाकडून एकाच मतदारसंघात भरला अर्ज

Criminal Killed Police : कुख्यात गुंड युनूस पटेलचा पाठलाग करून एन्काउंटर, १२ गंभीर गुन्हे दाखल

तिकिटासाठी २.७ कोटी मागितले! नेत्याचा आरोप, माजी मुख्यमंत्र्यांच्या दारात कपडे फाडून घेत जमिनीवर लोळला

Latest Marathi News Live Update : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाने केलेल्या हल्ल्यात चिमुकला मुलगा गंभीर जखमी

Raj Thackeray : महाराष्ट्रात नवे ९६ लाख खोटे मतदार, आगामी निवडणुकांचा निकाल आधीच ठरलाय; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT