पुणे

‘तनिष्का व्यासपीठा’तर्फे मंगळवारी मोफत समुपदेशन

CD

पुणे, ता. १२ : ‘तनिष्का व्यासपीठा’च्या वतीने महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत समुपदेशन केंद्राला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. वाढती मागणी लक्षात घेता येत्या मंगळवारी (ता. १४) महिलांसाठी वैयक्तिक समुपदेशन होणार आहे.
सध्याची बदललेली जीवनशैली, वाद, नातेसंबंध यामुळे अनेक महिला सतत तणावाखाली असतात. आपल्या मनातील अनेक भावना त्या दडपून टाकतात किंवा सहन करत राहतात. महिलांना मोकळे होण्याची संधीच मिळत नसल्याने त्यांच्यात हतबलता येते. मात्र या समुपदेशनाच्या माध्यमातून अनेक महिला आयुष्यातील समस्या, प्रश्न मोकळेपणाने मांडत असल्याने, त्यावर मात करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही संधी प्रत्येक महिलेला मिळावी, या उद्देशाने ‘तनिष्का व्यासपीठा’च्या वतीने महिलांसाठी मोफत समुपदेशन आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
वरिष्ठ विवाह समुपदेशक डॉ. स्मिता प्रकाश जोशी यांचे यासाठी मार्गदर्शन असून रश्मी वेंगुर्लेकर, श्रद्धा सरदेशमुख, सुप्रिया देवकर महिलांना समुपदेशन करणार आहेत. यासाठी ७४४७४५२३३२ या क्रमांकावर व्हॉटसअॅपद्वारे नाव नोंदणी बंधनकारक असून आपली सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल. उर्वरित महिलांना समुपदेशकांच्या वेळेनुसार पुढील वेळ कळवली जाईल. सकाळ माध्यम समूहाच्या बुधवार पेठ येथील कार्यालयात येत्या मंगळवारी, दुपारी १२ वाजल्यापासून हे समुपदेशन होणार असून महिलांनी जास्तीचा वेळ काढून येणे अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT