पुणे

कोयता गँगमधील तिघे अटकेत

CD

पुणे, ता. १३ : हडपसर आणि इतर भागात दहशत माजविणाऱ्या कोयता गँगमधील दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी उसाच्या फडातून पसार झालेल्या दोघांना पाठलाग करून ताब्यात घेतले. तसेच, कोयता गँगमधील आणखी एकाला नगर जिल्ह्यातील पाथर्डी परिसरातून अटक करण्यात आली आहे.

कोयता गँगचा म्होरक्या स्वप्नील उर्फ बिट्ट्या संजय कुचेकर (वय २२, रा. मांजरी, हडपसर), पंकज गोरख वाघमारे (वय २८, रा. बंटर स्कुलजवळ, हडपसर), सत्यम विष्णू भोसले (रा.हडपसर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मांजरी परिसरात तीन जानेवारी रोजी दरोडा आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बिट्ट्या कुचेकर आणि पंकज वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ते पसार झाले होते. दोघेजण शिरुर तालुक्यातील पाबळ गावात येणार असल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक पाबळला गेले होते. पोलिसांना पाहताच कुचेकर आणि वाघमारे उसाच्या फडातून पसार झाले, परंतु पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले. तसेच, कोयता गँगमधील सत्यम भोसले याला पोलिसांच्या पथकाने नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

High Temperature : कोलकातामध्ये पन्नास वर्षातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद; हवामान खात्याने दिली माहिती

Latest Marathi News Live Update: शिवरायांचं 'ते' वाघनखं महाराष्ट्रात येणं लांबलं

Rinku Singh T20 WC 24 : मिठाई, फटाके अन् सेलिब्रेशन, रिंकूचा फोन आला अन्... वडिलांनी सांगितलं त्या दिवशी काय घडलं

Jitendra Awhad : गुजरातच्या भरभराटासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जातोय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

SCROLL FOR NEXT