पुणे

श्री साई एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेला ‘आदर्श समाज प्रबोधन पुरस्कार’

CD

पुणे, ता. २४ ‘‘आजचा समाज हा अधिकाधिक आत्मकेंद्री होत चालला आहे, यामध्ये नकारात्मक भावना दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी प्रामाणिकपणे आणि सचोटीने काम करणाऱ्या छोट्या संस्थांमुळे समाज योग्य रीतीने चालू आहे. आज खऱ्या अर्थाने माणूस घडविणारे संस्कार आणि शिक्षण देण्याची गरज आहे’’, अशी भावना ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी व्यक्त केली.
जनसज्जन सोशल वेल्फेअर फाउंडेशनतर्फे सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी विशेष मुलांना शिक्षण देणाऱ्या श्री साई एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेला ‘आदर्श समाज प्रबोधन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याप्रसंगी कीर्तनकेसरी ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रविण राठी, प्रभाकर सेलूकर, प्रदीप मोहोळ, नंदकिशोर एकबोटे आदी उपस्थित होते. पुरस्काराचे यंदा १३ वे वर्ष आहे.

चंद्रकांत वांजळे म्हणाले, ‘‘विशेष व्यक्तींकडे वेगळ्या प्रकारची ताकद असते. ते आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर केवळ वैयक्तिक विकासच नव्हे तर समाजातही चांगले परिवर्तन घडवू शकतात, अशा व्यक्तींना आपण समाजात मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. त्यांना विकासामध्ये आपल्याबरोबर घेणे हे आपले कर्तव्यच आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: शाहरुख खानचे दमदार अर्धशतक, गुजरातने पार केला 120 धावांचा टप्पा

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT