PMC Election
PMC Election esakal
पुणे

PMC Election : भाजपच्या ५७ ‘माननीयांच्या’ जागा धोक्यात!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीने एकीच्या बळावर भाजपचा कसब्याचा गड खेचून आणला. त्यामुळे एकत्रित लढल्यास भाजपचा बालेकिल्ल्यात पराभव करता येऊ शकतो, हे कालच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

ही आघाडी आगामी पुणे महापालिका निवडणुकीत कायम राहिली, तर भाजपच्या ९९ नगरसेवकांपैकी ५७ जणांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असे आकडेवारीवरून दिसत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात गेल्या २८ वर्षांपासून भाजपचा सलग सहा वेळा विजय झाल्याने पक्षासाठी हा मतदारसंघ सुरक्षित मानला जात होता.

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. तसेच राज्यातील सत्ताबदल आणि संघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने कसब्याकडे सर्वांच लक्ष लागले होते. मात्र महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवून भाजपचा ११ हजार मतांनी पराभव झाला.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्या वेळी १६२ पैकी ९९ नगरसेवक भाजपचे निवडून आले. या नगरसेवकांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली आहे.

आगामी महापालिका निवडणूक कधी होणार हे स्पष्ट नसले तरी कसब्याच्या पोटनिवडणुकीतील पराभव भाजपचे डोळे उघडणारा ठरणार आहे. महापालिकेत सत्ता हवी असेल तर किमान ८७ पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येणे आवश्‍यक आहेत.
त्यामुळे भाजपने यापूर्वी ११० नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

असा बसू शकतो फटका
- महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहिली तर भाजपला त्याचा थेट फटका
- चारचा प्रभाग झाला तर भाजपचे ९९ पैकी ५७ नगरसेवक धोक्यात
- ४२ नगरसेवकांवर आघाडीचा कोणताही प्रभाव नाही. तेथे भाजपची ताकद जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट
- आघाडीतील कुरबुरी, जागावाटपातील वाद, बंडखोरी, स्थानिक समीकरणे, नातीगोती, उमेदवाराची प्रतिमा या मुद्यांचा भाजपला दिलासाही मिळू शकतो.
- २०१७ च्या महापालिका निवडणुकीच्या निकालातील आकडेवारीवरून कोणत्या कोणत्या प्रभागात फटका बसू शकते, हे स्पष्ट होत आहे.

महाविकास आघाडी झाल्यास धोक्यात असणारे प्रभाग (क्र.)-भाजप नगसेवक संख्या
- १ धानोरी, कळस- ३
- ३ विमाननगर, सोमनाथनगर -४
- ५ वडगावशेरी, कल्याणीनगर -३
- ७ पुणे विद्यापीठ, वाकडेवाडी- ४
- ८ औंध, बोपोडी-४
- ९ बाणेर, बालेवाडी -२
- १० बावधन खुर्द, कोथरूड डेपो- २
- ११ रामबाग कॉलनी, शिवतीर्थनगर-१
- १४ डेक्कन जिमखाना- ४
- १६ कसबा, सोमवार पेठ -१
- १७ रस्ता पेठ, रविवार पेठ- १
-१८ खडकमाळ आळी, महात्मा फुले पेठ-३
- १९ लोहियानगर, कासेवाडी- १
- २१ कोरेगाव पार्क, घोरपडी-१
- २३ हडपसर गावठाण, सातववाडी-२
- २५ वानवडी-२
- २६ महंमदवाडी, कौसरबाग-१
- २९ नवी पेठ, पर्वती- २
- ३० जनता वसाहत, दत्तवाडी- ३
- ३१ कर्वेनगर- ३
- ३३ वडगाव, धायरी-१
- ३५ सहकारनगर, पद्मावती-१
- ३६ मार्केट यार्ड, लोअर इंदिरानगर-१
- ३७ अप्पर सुपर, इंदिरानगर-१
- ३८ बालाजीनगर, राजीव गांधीनगर-२
- ३९ आंबेगाव दत्तनगर, कात्रज गावठाण- १
- ४१ कोंढवा बुर्द, येवलेवाडी- ३

धोक्याची ही आहेत कारणे
- तिन्ही पक्षांच्या एकीचे बळ मिळणार
- काही प्रभागात भाजपचा प्रभाव कमी
- अनेक प्रभागांत शिवसेना (शिंटे गटाची) ताकद कमी

या भागात दिलासा
नागपूरचाळ फुलेनगर, बावधन कोथरूड डेपो, डहाणूकर कॉलनी, एरंडवणा, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, सॅलिसबरी पार्क, सिंहगड रस्ता, मार्केट यार्ड, इंदिरानगर या भागात भाजपला बऱ्यापैकी दिलासा मिळू शकतो. तेथे महाविकास आघाडीचा प्रभाव कमी असल्याचे २०१७ च्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT