पुणे

‘वाचकांपर्यंत आशय पोहोचवण्यासाठी उत्तम कथाबीज आवश्यक ः मिरासदार

CD

पुणे, ता. २५ ः ‘‘तंत्रज्ञानामुळे प्रकाशन विश्वात बदल घडतो आहे. ई-बुक या दृक-श्राव्य माध्यमामुळे लेखकाच्या भावना अधिक उत्कटपणे वाचकांपर्यंत पोहोचतात, परंतु मूळ कथाबीज उत्तम असेल तरच कथेचा आशय वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो’’, असे मत स्टोरीटेलचे भारतातील सल्लागार प्रतिनिधी प्रसाद मिरासदार यांनी व्यक्त केले.
मराठी नववर्ष दिनानिमित्त कथा बाय स्नेहल बाकरे आणि झंकार स्टुडिओ पब्लिशिंगतर्फे ‘ब्लॉक ते ब्लॉग’ या ११ मराठी कथांच्या अक्षरोत्सवात ते ‘प्रकाशन व्यवसायाचे ग्लोबल स्वरूप’ या विषयी बोलत होते. याप्रसंगी दिलीपराज प्रकाशनचे संचालक राजीव बर्वे, स्नेहल बाकरे, सुनीता ओगले आदी उपस्थित होते.
या वेळी सुनीता ओगले लिखित ‘मैत्रीण’ या ऑडिओबुकचे प्रकाशन आणि या पुस्तकातील ‘अण्णा माझे चुकले का?’ या कथेचे अभिवाचन करण्यात आले. झंकार स्टुडिओचे संचालक सत्यजित पंगू यांनी प्रास्ताविक केले तर स्मिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT