पुणे

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मनसेचे आंदोलन

CD

पुणे, ता. २४ ः पुणे रेल्वे स्थानकावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे अपुरे व अकार्यक्षम आहेत, आरपीएफ आणि जीआरपी यांच्यात ताळमेळ नाही, प्रवाशांचे होणारे अपहरण, मारामारी यामुळे प्रवासी सुरक्षितता धोक्यात आली आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर होऊन तत्काळ उपाययोजना आखाव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पुणे डीआरएम कार्यलयासमोर आंदोलन केले. या वेळी मनसेचे शहर प्रमुख साईनाथ बाबर, माजी नगरसेवक वसंत मोरे, अजय कदम, अनिल परदेशी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे रेल्वे स्थानक देशातील महत्त्वाचे स्थानक आहे. रोज सुमारे दीड लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केवळ ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहे. त्यातील देखील काही बंद आहेत तर काहीचे क्षमता घटली आहे. त्यामुळे एखाद्या गुन्हाच तपास करताना पोलिसांना खूप अडचणी येतात. सीसीटीव्हीचे फुटेजदेखील उपलब्ध होत नसल्याने अनेक गुन्हांचा तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षितेच्या संदर्भात रेल्वे प्रशासनाला वारंवार सांगूनदेखील कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे आम्ही आजचे आंदोलन केवळ रेल्वे प्रशासनाला जागे करण्यासाठी केले असल्याचे सांगून हा प्रश्न सुटला नाही, तर आम्ही मनसे स्टाइल आंदोलन करू असा इशारा या वेळी वसंत मोरे यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT