पुणे

पुणे महापालिका लावणार ६५ हजार वृक्ष

CD

पुणे, ता. २५ ः महापालिकेकडून राबविण्यात येत असलेला मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष बाधित होणार आहेत. महापालिकेकडून काही वृक्षांचे पुर्नरोपण करण्याबरोबरच तब्बल ६५ हजार देशी वृक्ष लावण्याचे महापालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यामुळे बाधित वृक्षांच्या बदल्यात पुर्नरोपण व नव्या देशी वृक्ष लावण्याची मात्रा आता महापालिकेकडून दिली जाणार आहे.

महापालिकेकडून संगम पुल ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा या ठिकाणी मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविला जात आहे. त्यासाठीच्या कामांनाही सुरुवात झाली आहे. पुनरुज्जीवनाचे काम करीत असताना मोठ्या प्रमाणात वृक्ष बाधित होणार आहेत. बाधित होणाऱ्या वृक्षांपैकी ४ हजार ४२९ वृक्षांचे पुर्नरोपण करण्यात येणार आहे. तर ३ हजार ११० वृक्ष काढण्यात येणार आहे. महापालिकेकडून बाधित वृक्षांच्या बदल्यात महापालिकेकडून ६५ हजार ४३४ वृक्ष लावण्यात येणार आहेत. तसेच नदीच्या दोन्ही काठांवर मोठ्या प्रमाणत झुडपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसंस्था सुधारण्यास मदत होणार असल्याचे महापालिकेने दिलेल्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.

दृष्टिक्षेपात
- बाधित होणाऱ्या वृक्षांपैकी ४, ४२९ वृक्षांचे पुर्नरोपण
- ३ हजार ११० वृक्ष काढण्यात येणार
- बाधित वृक्षांच्या बदल्यात ६५,४३४ वृक्ष लावली जाणार

या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या वृक्षांची पाहणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तयार केलेल्या वृक्ष तज्ज्ञ समितीमार्फत करण्यात आली आहे. काही नागरीकांनी घेतलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणामार्फत महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यांच्या मान्यतेनंतरच महापालिकेकडून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

योग्य उंचीच्या वृक्षास प्राधान्य
बाधित होणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात महापालिका ६५ हजार वृक्ष लावणार आहे. या वृक्षांमध्ये तज्ज्ञांनी सुचविलेली व योग्य उंचीची वृक्ष लावण्यात येणार आहे. त्याबरोबरच पुढील पाच ते सात वर्ष संबंधित वृक्षांचे संगोपन केले जाणार असल्याचेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT