पुणे

गावठाणांचे सर्वेक्षण तीन महिन्यांत पूर्ण होणार

CD

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३ : पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत सुरू असलेल्या ड्रोन सर्वेक्षणात आत्तापर्यंत सहा हजार १३६ गावांपैकी पाच हजारांहून अधिक गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित गावांच्या सर्वेक्षणाचे काम पुढील तीन महिन्यात पूर्ण करण्याचा निर्णय अभिलेख विभागाने घेतला आहे.

केंद्र सरकारच्या ‘स्वामित्व’ योजनेंतर्गत राज्यातील सर्वेक्षण न झालेल्या गावठाणांचे ड्रोन सर्वेक्षण करण्याचे काम भूमी अभिलेख विभागाने हाती घेतले आहे. ज्या गावठाणांचे सर्वेक्षण झाला नाही, त्यांचे आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पुणे विभागात एकूण सहा हजार १३६ गावांचे ड्रोन सर्व्हे करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी पाच हजार १३६ गावांचा ड्रोन सर्व्हे झाला आहे. उर्वरीत गावांचे सर्व्हे येत्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ आहे. विभागातील पाच हजार १३३ गावांपैकी २१३ गावांचा प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्रिका) ऑनलाइन उपलब्ध झाली आहे. २१३ गावांमध्ये सुमारे एक लाख ४२ हजार एवढे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले आहेत. ड्रोन सर्व्हे झालेल्या गावठाणांचा नकाशा तयार करणे शक्य होणार आहे. तसेच सर्व्हे झालेल्या गावठाणातील घरांची प्रत्यक्ष जागेवर मोजणी करता येते. गावठाण हद्दीतील प्रत्येक घरांचे नकाशाच्या आधारे प्रॉपर्टी कार्ड तयार करता येणार आहे. तसेच प्रॉपर्टी कार्डाच्या आधारे सनद तयार करता येते, अशीही माहिती भूमी अभिलेख विभागाकडून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT