पुणे

वक्तृत्व स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

CD

पुणे, ता. १३ : सरस्वती प्रज्ञा प्रबोधिनी आयोजित श्री सरस्वती विद्या मंदिर (कर्वेनगर) शाळेत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत गट क्रमांक एक - पाचवी ते सातवी, गट क्रमांक दोन- आठवी ते दहावी आणि गट क्रमांक तीन- अकरावी बारावी मिळून ६० स्पर्धक होते. कार्यक्रमात विद्या प्रतिष्ठानचे कार्यवाह रत्नप्रभा राजहंस, व्हीजन इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या कांचन सातपुते यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे परीक्षण चित्रा भावे, अंजली भागवत, अनुराधा थत्ते, चित्रा मोहरीर, अमृता यादवाड यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका अनुया सायगावकर, सुनीता जाधव, उज्ज्वला ढेरे, सिद्धी सरपोतदार यावेळी उपस्थित होते. स्पर्धेत पहिल्या गटात पंडित जवाहरलाल नेहरू शाळा, दुसऱ्या आणि तिसऱ्या गटात महिलाश्रम शाळेतील विद्यार्थी बक्षीस पटकाविले.

मोझे संस्थेतर्फे नेत्र तपासणी
पुणे, ता. १३ : येरवडा येथील गेनबा सोपानराव मोझे संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त पंधरा हजार विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. यानिमित्त शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी निबंध, प्रश्न मंजूषा, चित्रकला, कथाकथन स्पर्धा तसेच पालकांसाठी गीत गायन, संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्‌घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ मोझे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, शालेय समिती अध्यक्ष अलका पाटील, मुख्याध्यापक जालिंदर भागवत, राजकुमार गायकवाड, संजय सोमवंशी, लक्ष्मण यादव, सुधीर शिंगटे, सुनील वळसे, मारुती दसगुडे आदी उपस्थित होते.

‘आयडियल’तर्फे वैद्यकीय वस्तूंचे वाटप
पुणे, ता. १३ : आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने सय्यदनगर परिसरातील रहमानी मदरसा या मुलींच्या अनाथालयात वैद्यकीय वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात प्रा. शोएब इनामदार, डॉ. अबोली इनामदार यांनी स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. याप्रसंगी प्रा. शफी इमानदार, प्रा. शोएब इमानदार, शकिला इनामदार, मुख्याध्यापिका शाहीन मुजावर, कौसर इनामदार, नेहा पठाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कार्याध्यक्ष फहिम इनामदार यांनी केले.

भिडे गुरुकुल शाळेत चर्चासत्र
पुणे, ता. १३ : मोहनराव भिडे संस्कार गुरुकुल शाळेत ‘मुलांसाठी चलनाची उत्क्रांती’ विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यावेळी योगेश नाईक यांनी मुलांना विविध प्रकारच्या नोटा, नाणी दाखवल्या. तसेच आठ हजार वर्षांत चलन कसे विकसित झाले याची माहिती दिली. संग्रहातील सुमारे दोनशे देश, राज्ये, प्रांत आणि बँक नोट त्यांनी प्रदर्शित केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : कणकवली नगरपालिकेतील सत्ता युद्ध, शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता

Bachchu Kadu: बच्चू कडू यांनी मिंथुरला भेट देत पीडित रोशनला दिला धीर; किडनी विकली गेली तरी सरकार गप्प का?

Chandrapur News: किडनी विक्रीच्या जाळ्यात बांगलादेशातील तरुण; पीडितांमध्ये राजस्थान, बिहार, पंजाब, हरियाना, उत्तरप्रदेशचे युवक

Latest Marathi News Live Update: सीबीआयने लाचखोरीच्या आरोपाखाली लेफ्टनंट कर्नलला केली अटक , दिल्लीतील घरातून २ कोटी रुपये जप्त

Panchang 21 December 2025: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण आणि ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT