Diwali Pahat 2023 Advaita Maifil esakal
पुणे

Diwali Pahat 2023 : दिवाळीत रंगणार 'अद्वैता' मैफील; रसिकांना मिळणार आध्यात्मिक यात्रेची संगीतमय अनुभूती, कधी आणि कुठे असणार कार्यक्रम?

या कार्यक्रमाची संकल्पना, संगीतरचना व गायन देवकी पंडित यांचे असून संहिता आणि निवेदन वैभव जोशी यांचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबरला पहाटे होणाऱ्या या मैफिलीतून रसिकांना आध्यात्मिक यात्रेची जणू काही संगीतमय अनुभूती घेता येईल.

पुणे : लखलखत्या तेजाचा उत्सव असणाऱ्या दिवाळीच्या (Diwali Pahat 2023) प्रारंभी पुणेकर रसिकांसाठी ‘सकाळ’ने शब्दस्वरांची अनोखी मैफील आयोजित केली आहे. भारतातील सात संत स्त्रियांचे लेखनकार्य तसेच जीवनकार्य उलगडणारी ‘अद्वैता’ ही अनोखी मैफील ज्येष्ठ गायिका देवकी पंडित आणि प्रतिभावंत कवी-गीतकार वैभव जोशी सादर करणार आहेत.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबरला पहाटे होणाऱ्या या मैफिलीतून रसिकांना आध्यात्मिक यात्रेची जणू काही संगीतमय अनुभूती घेता येईल. या मैफिलीत महाराष्ट्रातील संत जनाबाई व संत मुक्ताबाई, काश्मीरमधील संत लल्लेश्वरी, गुजरातच्या संत गंगासती, राजस्थानच्या संत मीराबाई, कर्नाटकच्या आक्का महादेवी आणि तमिळनाडूतील संत अंडाल यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना, संगीतरचना व गायन देवकी पंडित यांचे असून संहिता आणि निवेदन वैभव जोशी यांचे आहे. प्रत्येक संत कवयित्रींच्या दोन रचना सादर केल्या जातील. वैभव जोशी या रचनांचा यांनी मराठीत भावानुवाद केला आहे. या रचनांमागील काळाचा आणि पार्श्वभूमीचा विचार करून त्यानुसार देवकी पंडित यांनी त्या संगीतबद्ध केल्या आहेत. लोकांना फारशा परिचित नसलेल्या या संत स्त्रियांचे जीवनकार्य लोकांपर्यंत पोहोचवणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे.

ही मैफल १२ नोव्हेंबरला पहाटे ५.३० वाजता कर्वेनगरमधील डी. पी. रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे होईल. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध बुधवार पेठेतील सकाळ कार्यालय आणि पंडित फार्म्स येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत उपलब्ध आहेत. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असून भारती विद्यापीठ ‘पॉवर्ड बाय’ प्रायोजक आहेत. ‘क्रोमा’ हे ‘इलेक्ट्रॉनिक्स पार्टनर’ असून लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी लि. आणि चितळे दूध हे सहप्रायोजक आहेत.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक महान स्त्रियांच्या जीवनाचा, लेखनशैलीचा अभ्यास करता आला. अशा प्रकारचे कार्य आपल्या हातून घडावे, यासाठी आपण प्रतिक्षा करीत असतो. ही संधी देवकी पंडित यांच्यामुळे मिळाली याचा आनंद आहे. लखलखीत दिव्यांनी आपण दिवाळी पहाट साजरी करतो, परंतु यंदा आपण भारतवर्षातील महान संत स्त्रियांच्या लखलखीत विचारांनी यंदाची दिवाळी पहाट साजरा करू.

-वैभव जोशी, कवी-गीतकार

डॉ. अरुणा ढेरे यांच्या लेखनामुळे मला या संत स्त्रियांच्या कार्याशी ओळख झाली. त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळत गेल्यावर मी थक्कच झाले. स्त्री सक्षमीकरणाचा खरा अर्थ मला त्यांच्या कार्यात सापडला. यातील प्रत्येकीची भाषा आणि प्रांत वेगवेगळे असले, तरी त्यांचा मार्ग एकच होता, तो म्हणजे भक्तीचा. त्यांचे कार्य जनमानसापर्यंत पोहोचायलाच हवे, या उद्देशातून या कार्यक्रमाची संकल्पना सुचली. यासाठी आम्ही सखोल अभ्यास केला असून प्रत्येक रचनेचा, प्रत्येक शब्दाचा अन् सुराचा बारकाईने विचार केला आहे. दिवाळीनिमित्त ही आध्यात्मिक अनुभूतीची संगीतमय पणती प्रत्येकासमोर ठेवता येत आहे याचा आनंद आहे.

-देवकी पंडित, ज्येष्ठ गायिका

विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध

ही मैफील १२ नोव्हेंबरला पहाटे ५.३० वाजता कर्वेनगरमधील डी. पी. रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे होणार आहे. या कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश आहे, मात्र त्यासाठी प्रवेशिका आवश्यक आहेत. या प्रवेशिका सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत बुधवार पेठेतील सकाळ कार्यालय आणि पंडित फार्म्स येथे उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : नागपूरमध्ये कोराडी मंदिराचं निर्माणाधीन लोखंडी गेट कोसळलं, १५ मजूर जखमी, स्लॅब टाकण्याचे सुरू होते काम

Election Commission : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द, महाराष्ट्रातील 9 पक्षांचा समावेश, कारण काय?

Chandrashekhar Bawankule : महसूल–पोलीस संगनमत उघड! वाळू माफियांना मिळते सरकारी पाठबळ? मंत्र्यांच्या थेट कबुलीनं चर्चांना उधाण...

Donald Trump : टॅक्समध्ये सूट मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्या पत्नीच्या मृतदेहाचा केला वापर? नियमाचा घेतला गैरफायदा, वाचा काय आहे प्रकरण?

Thane Politics: ठाण्यात राज ठाकरे आणि शरद पवारांना मोठा धक्का, एकनाथ शिंदेंच्या शिंदेसेनेचं बळ वाढलं

SCROLL FOR NEXT