Gaiea Sanskrit Rabbi Shergill Mukhtiar Ali Sakal Suhana Swasthyam Program
Gaiea Sanskrit Rabbi Shergill Mukhtiar Ali Sakal Suhana Swasthyam Program esakal
पुणे

Suhana Swasthyam Program : आरोग्य, वेलनेसचा 'या' महिन्यात महोत्सव; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ करणार मार्गदर्शन, कुठे असणार कार्यक्रम?

सकाळ डिजिटल टीम

एक ते तीन डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ‘स्वास्थ्यम्’ मध्ये विविध वस्तू आणि सेवांचेही प्रदर्शन होणार आहे.

पुणे : शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी (Health) गेल्या वर्षी लोकप्रिय व उपयुक्त ठरलेल्या ‘स्वास्थ्यम्’ या बहुचर्चित उपक्रमाचे दुसरे पर्व ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ (Sakal Suhana Swasthyam Program) १, २ आणि ३ डिसेंबरला होणार आहे. अध्यात्म, योग-प्राणायाम, ध्यान, आरोग्य, सकारात्मक मानसिकता आदी विविध क्षेत्रांतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘सुहाना मसाले’, तर पॉवर्ड बाय प्रायोजक ‘भारती विद्यापीठ’, फायनान्शियल हेल्थ पार्टनर ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. (मल्टी स्टेट)’, सहयोगी प्रायोजक चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि’. आहेत. तसेच ऊर्जा पार्टनर म्हणून ‘निरामय वेलनेस सेंटर’, हेल्थ पार्टनर ‘शारंगधर नॅचरल हेल्थ केअर’ आणि ईव्ही पार्टनर एथर आहेत.

संतुलन आयुर्वेदचे (Ayurveda) व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुनील तांबे सादर करणार असलेल्या नामजपाने आरोग्याच्या या स्वास्थ्यपूर्ण महाजागरास आणि आध्यात्मिक प्रवासास सुरुवात होणार आहे. उपक्रमांतर्गत ‘समग्र सृष्टीचे कल्याण आणि माइंडफुल लिव्हिंग’ या विचारधारेवर प्रकाश टाकणाऱ्या ‘स्वास्थ्यम्’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

प्रमुख मार्गदर्शक

योगी व आध्यात्मिक गुरू श्री एम, पतंजली आयुर्वेदाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण, प्रसिद्ध पौराणिक लेखक अक्षत गुप्ता, केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या इंडियन नॉलेज सिस्टीम विभागाच्या आउटरीच प्रोग्रॅम कोऑर्डिनेटर डॉ. अनुराधा चौधरी व फाउंडेशन फॉर हेड अँड नेक ऑन्कोलॉजीच्या अध्यक्षा व प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. ज्योती दाभोळकर मार्गदर्शन करतील.

तज्ज्ञांचा प्रेक्षकांशी संवाद

मंत्र जपाचा परिणाम केवळ मनावर होत नाही तर मानसिक आणि शारीरिक आरोग्य अशा दोन्हींवर होतो. मंत्राचा जप केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. या उपक्रमांतर्गत वैदिक मंत्राचे महत्त्व आणि त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ग्रेट ब्रिटनमधील येथून गैय्या संस्कृत या येणार असून, ‘सखी चारचौघी’च्या संचालिका श्रीगौरी सावंत, प्रसिद्ध परफ्युमर व सुगंधी तज्ज्ञ राजीव शेठ, निरामय वेलनेस सेंटरच्या संचालिका अमृता चांदोरकर आणि गिर्यारोहक प्रियांका मोहिते, आशिष माने व उमेश झिरपे आदी प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय विविध क्षेत्रातील अनेक नामवंत तज्ज्ञ उपक्रमात सहभागी होणार असून, त्यांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील.

संगीतमय कार्यक्रमांची मेजवानी

या उपक्रमात सूफी संगीतातील प्रसिद्ध गायक मुख्तियार अली व प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार आणि गायक रब्बी शेरगील यांच्या गायनाच्या व संगीताच्या कार्यक्रमांचा आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमच्या विनोदी कलाकृतीचा आनंद लुटता येणार आहे.

का उपयुक्त?

आजच्या धावपळीच्या व स्पर्धात्मक युगात मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणे आवश्यक झाले आहे. चिंता, काळजी, भीती, ताण-तणाव वाढत असून, त्यातून नैराश्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. मानसिक समस्या व एकूणच मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन व योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. तसेच, प्रत्येक पाच व्यक्तींमागे एका व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा मानसिक व शारीरिक त्रास होत असतो. त्यातील फक्त दहा टक्के लोकांना उपचार मिळतात. चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. त्यासाठी ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ नागरिकांना उपयुक्त ठरणार आहे.

‘स्वास्थ्यम्‌’ कशासाठी?

  • संस्कृत व वैदिक मंत्रांचा जप आणि आरोग्य

  • ध्यान-धारणा विषयी शास्त्रीय माहिती

  • निरोगी व तंदुरुस्त आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम याबाबत मार्गदर्शन

  • अध्यात्म आणि सुदृढ आरोग्य यांचा सहसंबंध

  • गायन, कला व संगीताचा आरोग्याशी संबंध

कधी व कुठे?

१ ते ३ डिसेंबर- २०२३, पंडित फार्म, डीपी रस्ता, कर्वेनगर, पुणे.

खालील विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला भेट द्या...

: instagram.com/globalswasthyam

: facebook.com/globalswasthyam

: twitter.com/GlobalSwasthyam

‘सकाळ-स्वास्थ्यम्’ पर्व दुसरे या उपक्रमाबाबत अपडेट माहिती (उपक्रमाचे वेळापत्रक, मार्गदर्शक व विषय आदी तपशील) दैनिक ‘सकाळ’मधून लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

व्यावसायिकांना स्टॉल बुकिंगची संधी; आजच आपला स्टॉल बुक करा

एक ते तीन डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ‘स्वास्थ्यम्’ मध्ये विविध वस्तू आणि सेवांचेही प्रदर्शन होणार आहे. त्यात सहभागी होणाऱ्या व्यावसायिक व संस्थांना प्रदर्शनासाठी दहा बाय दहा फूट जागा, दोन टेबल्स, खुर्च्या आणि विजेची सुविधा पुरविण्यात येईल. प्रदर्शनासाठी स्टॉलची बारा हजार व प्रीमियम स्टॉलची पंधरा हजार रुपये किंमत आहे. स्टॉल बुकिंगसाठी ८७६६४२४९९२ / ७७२२००१०९७ या मोबाईल क्रमांकावर अथवा raibhan.shinde@esakal.com या मेल आयडीवर संपर्क साधावा.

उपक्रमात सहभागासाठी नावनोंदणी आवश्यक

‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ उपक्रमाबद्दल अधिक माहिती globalswasthyam.com या वेबसाइटवर मिळेल. या उपक्रमात प्रवेश विनामूल्य आहे. उपक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी सोबतचा क्युअर कोड स्कॅन करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT