पुणे

आनंदाचा शिधा वाटपात अद्यापही विलंबच

CD

पुणे, तर. १२ : दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य सरकारने रास्त भाव धान्य दुकानांमधून आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली. मात्र, आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांत केवळ १३ टक्के, तर उर्वरित ग्रामीण भागात ६५ टक्के शिधाचे वाटप करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.

गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यामध्ये अंत्योदय व प्राधान्य योजनेतील लाभार्थ्यांना १०० रुपयांत एक लिटर तेल, एक किलो रवा, एक किलो हरभरा डाळ, एक किलो साखर मिळणार आहे. दिवाळीलादेखील असा शिधा वाटला होता. त्यासाठी एकाच खासगी यंत्रणेला पुरवठ्याचे काम दिले होते. त्यामुळे राज्यभर हा शिधा पोचला नाही. मात्र, राज्य सरकारने जास्तीच्या यंत्रणा नेमल्या आहेत. निविदा अंतिम करण्यात विलंब झाल्याने गुढी पाडव्याला हा शिधा मिळण्यास अडचणी आल्या होत्या. त्यामुळे डॉ. आंबेडकर जयंतीपर्यंत शिधा वाटप पूर्ण करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये १३ टक्के, तर ग्रामीण भागात ६५ टक्के लाभार्थ्यांपर्यंतच बुधवारपर्यंत (१२ एप्रिल) हा शिधा पोहोचला आहे. पुणे जिल्ह्यातील शिधा लाभार्थ्यांची संख्या पाच लाख ६१ हजार आहे. तर शहरात ३ लाख १७ हजार लाभार्थी आहेत.

आनंदाचा शिधा वाटपाचे काम जिल्ह्यात ६५ टक्के झाले आहे, तर शहरात विलंबाने सुरुवात केल्याने अद्याप बरेच वाटप बाकी आहे. ग्रामीण भागात पाच लाख ६१ हजार ९३ लाभार्थी असून मार्च महिन्यात एक लाख ८३ हजार २१९, तर एप्रिल महिन्यात आतापर्यंत एक लाख ८२ हजार ५३४ अशा एकूण तीन लाख ६५ हजार ७५३ शिधापत्रिकाधारकांना शिधा वाटप केला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी दोन दिवसांत जास्तीत जास्त शिधा वाटप करण्याचे आदेश दिले आहेत.
- सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT