पुणे

पत्रकार वरुणराज भिडे पुरस्कार ‘सकाळ’च्या पाटसकर यांना जाहीर

CD

पुणे, ता. २४ : पत्रकारितेतील मानाचा समजला जाणारा पत्रकार वरुणराज भिडे पुरस्कार जाहीर झाला असून, दैनिक ‘सकाळ’ च्या पुणे आवृत्तीचे सहयोगी संपादक सुरेंद्र पाटसकर यांना मुख्य पुरस्काराने गौरविले जाणार आहे. रोख रुपये पंचवीस हजार, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

शनिवारी (ता. २९) सकाळी १० वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या वेळी आश्वासक पत्रकार पुरस्काराने ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या चैत्राली चांदोरकर, ‘पुढारी’च्या सुषमा नेहरकर-शिंदे, ‘एबीपी माझा’च्या अभिजित कारंडे यांना सन्मानित केले जाणार असल्याची माहिती डॉ. सतीश देसाई यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुरस्काराचे हे २१ वे वर्ष आहे. मराठी पत्रकारितेत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या पत्रकारास मुख्य पुरस्कार दिला जातो. तसेच पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांना आश्वासक पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित केले जाते. शहरी व ग्रामीण भाग असे त्याचे स्वरूप आहे. तसेच वृत्तवाहिनी माध्यमातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांनादेखील आश्वासक पुरस्कार दिला जातो.

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे असतील. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागात २०२१-२२ यावर्षी प्रथम आलेल्या कौस्तुभ राणे व चालू घडामोडी या विषयासाठी सुनील जाधव यांनादेखील पुरस्कार दिला जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. या वेळी जयराम देसाई, प्रकाश भोंडे, डॉ. शैलेश गुजर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : 'ईव्हीएम हॅक करतो' म्हणत अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी; एक जण पोलिसांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT