Vidya Education Expo 2023
Vidya Education Expo 2023 sakal
पुणे

Vidya Education Expo 2023 : ‘एज्युकेशन एक्स्पो’साठी आजच करा नोंदणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा संपली की वेध लागतात ते महाविद्यालयीन शिक्षणाचे आणि करिअरची नेमकी दिशा ठरविण्याचे. अनेकदा विद्यार्थी-पालकांना महाविद्यालय, करिअर निवडताना कसरत करावी लागते किंवा अनेकदा गोंधळ उडतो. त्यावेळी गरज असते ती ठरविलेल्या करिअरबाबत योग्य मार्गदर्शन मिळण्याची, योग्य दिशा देण्याची.

आयुष्याच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर सकाळ माध्यम समूह ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२३’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करतो. यासाठी आता शैक्षणिक संस्थांच्या नोंदणीला सुरुवात झाली असून, ९ ते ११ जूनदरम्यान गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

स्टॉलचे बुकिंग कोण करू शकते
पुण्यासह राज्यातील नामांकित शिक्षण संस्थांना या प्रदर्शनात सहभागी होता येईल. तसेच प्रदर्शनात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शनपर चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालयापासून ते कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेसच्या ‘केजी टू पीजी’ अभ्यासक्रमांसाठी येथे स्टॉलचे बुकिंग करता येणार आहे.

एकाच छताखाली सर्व माहिती...
महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर शिक्षणाच्या उपलब्ध असणाऱ्या पर्यायांची माहिती; याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान यांसह अन्य अभ्यासक्रमांच्या माहितीचे प्रदर्शन यात असणार आहे. त्याचबरोबर जेईई, नीट, सीईटी यांसह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही मार्गदर्शन करणाऱ्या शैक्षणिक संस्था यात सहभागी होऊ शकतात.

येथे करा ‘स्टॉल्स’चे बुकिंग
या शैक्षणिक प्रदर्शनात तुम्हाला तुमचा स्टॉल असावा, असे वाटतंय का! तर मग लवकरात लवकर संपर्क साधा आणि शिक्षण आणि करिअरबाबत मार्गदर्शन, माहिती विद्यार्थी-पालकांपर्यंत पोचविण्यासाठी तयार व्हा.
संपर्क : संदीप बेदरकर : ८३८००७२०४९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT