fibroids sakal
पुणे

Women Health : महिलांमध्ये वाढतेय फायब्रॉइड्सची समस्या

पुणे शहरात गेल्या पाच वर्षांत गर्भाशयातील फायब्रॉइड्सची समस्या वाढल्याचे दिसून येते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात गेल्या पाच वर्षांत गर्भाशयातील फायब्रॉइड्सची समस्या वाढल्याचे दिसून येते. करिअरला प्राधान्य देणे, उशीर होणारे लग्न आणि उशिराने होणारी गर्भधारणा यासारख्या कारणांमुळे फायब्रॉइड्समध्ये वाढ झाली आहे.

कामाचा वाढता व्याप, वाढलेला तणाव आणि जीवनशैलीतील बदल हे फायब्रॉइड प्रकरणांमध्ये वाढ होण्यास कारणीभूत ठरतात. लक्षणे जाणवताच त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्वरित उपचार घेणे ही काळाची गरज आहे. गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स ज्याला ‘लेओमायोमास’ किंवा ‘मायोमास'' देखील म्हणतात.

गर्भाशयात आढळणाऱ्या या स्नायूंच्या गाठी असतात. साधारणतः वयवर्षं ३० ते ४० दरम्यान हा आजार होतो. फायब्रॉइड्स हे एकापेक्षा जास्त असू शकतात, ‘बी’च्या आकारापासून ते खरबुजाच्या आकारापर्यंत वाढू शकतात. गर्भाशयाचे फायब्रॉइड्स प्राणघातक नसतात. परंतु, ते अस्वस्थता निर्माण करू शकतात आणि जास्त रक्तस्रावामुळे लाल रक्तपेशी (अ‍ॅनिमिया) नष्ट झाल्यामुळे थकवा येऊ शकतो. शिवाय महिलांना नैराश्य, चिंता, तणाव आणि भीतीचाही सामना करावा लागू शकतो.

सामान्य लक्षणे

सर्वच स्त्रियांना लक्षणे जाणवतील असे नाही. परंतु, सामान्य लक्षणांमध्ये मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्राव, ओटीपोटात वेदना, वारंवार लघवी होणे, मूत्राशयावर दाब येणे, गुदाशयात वेदना होणे, कंबर दुखणे, बद्धकोष्ठता, पोटात गोळा येणे, सात दिवसांपेक्षा जास्त काळ टिकणारी मासिक पाळी, रक्ताच्या गुठळ्या आणि अति रक्तस्राव यांचा यामध्ये समावेश होतो.

रुग्णांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ

मदरहूड हॉस्पिटल्सचे प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पद्मा श्रीवास्तव म्हणाले, ‘‘फायब्रॉइड्सचे निदान न झालेल्या महिलांची संख्या अधिक आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत आता फायब्रॉइडच्या रुग्णांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वयवर्षं ३० पेक्षा जास्त वयाच्या बहुतेक महिलांना ही समस्या जाणवते. बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या २५ टक्के स्त्रिया फायब्रॉइड्सशी संबंधित तीव्र स्राव होणाऱ्या मासिक पाळीची तक्रार घेऊन येतात.’’

ही आहेत प्रमुख कारणे

संप्रेरकांमधील असंतुलन - ‘एस्ट्रोजेन'' आणि ‘प्रोजेस्टेरॉन'' मासिक पाळीचे नियमन करणारे संप्रेरकामुळे फायब्रॉइड वाढतात.

आनुवंशिक स्थिती - फायब्रॉइडच्या विकासासाठी आनुवंशिक घटकही कारणीभूत ठरु शकतात.

जीवनशैली आणि आहार - लठ्ठपणा आणि लाल मांसाचे प्रमाण जास्त आणि फळे आणि भाज्यांचे सेवन कमी करणे यासारख्या घटकांमुळे धोका वाढू शकतो.

वैद्यकीय इतिहास - गर्भधारणा उशिरा होणे, यामुळेही फायब्रॉइड्सचा धोका वाढू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leopard Attack: हृदयद्रावक घटना! चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; गोंदियात जीव मुठीत धरून मुले घरातच, सहानंतर सामसूम!

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीला साडेसातीचा त्रास, पण यंदाच्या वर्षात नेतृत्व गुण उजळतील

द कपिल शर्मा शो फेम अभिनेत्रीला झालाय असाध्य आजार; मुलाने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

SCROLL FOR NEXT