पुणे

ज्येष्ठांसाठी वरदान ठरणारा ‘फ्रायडे मेमरी कॅफे’ मधुरभाव संस्थेच्या पुढाकारातून निर्मिती

CD

पुणे, ता. २७ : स्मृतिभ्रंश (डिमेन्शिया) आणि अल्झायमर सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या ज्येष्ठांसाठी वरदान ठरत आहे ‘फ्रायडे मेमरी कॅफे’. ज्येष्ठ नागरिकांना आसरा देणाऱ्या ‘मधुरभाव’ या संस्थेच्या पुढाकारातून या कॅफेची सुरुवात करण्यात आली असून, याद्वारे ज्येष्ठांच्या स्मृतीला चालना देण्याचे कार्य केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे ही सेवा मोफत असून, शहर व परिसरातील ज्येष्ठ नागरिक व त्यांचे कुटुंबीय याचा लाभ घेत आहेत.

मधुरभाव संस्थेच्या माध्यमातून डिमेन्शिया व अल्झायमर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असून संस्थेत अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात. ज्येष्ठांसाठी ‘सेकंड होम’ म्हणून उदयास आलेल्या या संस्थेला आता दहा वर्षे पूर्ण होत असून, गेल्या दशकभरामध्ये संस्थेद्वारे ज्येष्ठ नागरिकांना आनंदात त्यांचे पुढील जीवन जगण्याची ऊर्जा देण्यात येत आहे. दरम्यान, या वयात मेंदूच्या आजारांमुळे त्यांना जीवन जगताना अडचणी येऊ नयेत म्हणून संस्थेच्या संस्थापिका आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांच्या तज्ज्ञ डॉ. अंजली देशपांडे यांनी ‘मेमरी कॅफे’ या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्यांनी डिमेन्शिया विषयात डिप्लोमा केला असून, हा आजार असलेल्या ज्येष्ठांना कशाप्रकारे सांभाळायचे, त्‍यांना दिले जाणारे उपचार व आधार अशा विविध गोष्टींबाबत मार्गदर्शन करतात.

याबाबत डॉ. देशपांडे म्हणाल्या, ‘‘अलीकडे विभक्त कुटुंब पद्धतीचे प्रमाण वाढले असताना एकत्र कुटुंबातील प्रेम, जिव्हाळा, सुरक्षित वातावरण आदींचे धागे विरळ होत आहेत. झपाट्याने वाढणारा ‘जनरेशन गॅप’ याचा सुद्धा परिणाम ज्‍येष्ठांवर होणार आहे. शारीरिक व्याधी, भावनिक प्रश्‍न, एकटेपणा आदींमुळे त्‍यांना मानसिक आजाराच्या समस्‍या उद्‍भवतात. यासाठी ‘मेमरी कॅफे’ची कल्पना सुचली. यामध्ये मनोरंजनाच्‍या माध्यमातून त्यांच्या स्मरणशक्तीला चालना देण्याचे काम केले जाते. मेमरी कॅफेची सेवा संस्थेबरोबर इतर ज्येष्ठांनादेखील दिली जाते. यासाठी ६० वर्षांपुढील ज्येष्ठांना उपचार दिले जातात. आतापर्यंत ४०० हून अधिक ज्येष्ठांना मेमरी कॅफेचा लाभ झाला आहे.’’

मेमरी कॅफे दर शुक्रवारी सायंकाळी होत असून, यामध्ये केवळ ज्येष्ठ नागरिकच नाही तर त्यांच्या कुटुंबालाही मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते. डिमेन्शिया किंवा अल्झायमर असलेल्या घरातील ज्‍येष्ठांना सांभाळणे, त्यांच्याशी कसे बोलायचे, त्यांच्‍यासाठी कोणत्या क्रिया उपयुक्त आहेत, याबाबत त्यांच्या कुटुंबांला माहिती दिली जाते.
- डॉ. अंजली देशपांडे, संस्थापिका, ‘फ्रायडे मेमरी कॅफे’

ज्येष्ठांचे सेकंड होम
मधुरभाव संस्थेची स्थापना ही निराधार ज्येष्ठ नागरिक किंवा मानसिक आजारांमुळे कुटुंबाने संस्थेत दाखल केलेल्यांचा सांभाळ करण्याच्या हेतूने करण्यात आली. अनेकांना येथे मोफत सेवाही दिली जाते. तर त्यांना त्‍यांच्या जीवनातील सेकंड इनिंग अत्यंत आनंदाने जगता यावी, म्हणून मनोरंजन, खेळीमेळीचे वातावरणात अगदी घरचे वातावारण निर्माण केले जाते. संस्थेत अनुभवी डॉक्टर त्याचबरोबर सांभाळ करणारा कर्मचारी वर्ग, मनोविकारतज्‍ज्ञ, समुपदेशक आदी २४ तास सेवेसाठी तत्पर असतात. ज्येष्ठांसाठी हे त्यांचे सेकंड होम असून, त्यांच्यासाठी आरोग्यमय उपक्रम येथे राबविले जातात, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT