पुणे

चांडोलीतील मुलींच्या निवासी शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरू

CD

पुणे, ता. २८ : चांडोली (ता. खेड) येथील शासकीय निवासी शाळेत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलींच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. इयत्ता सहावी ते दहावीच्या (सेमी इंग्रजी माध्यम) विद्यार्थिनींसाठी ही प्रवेश प्रक्रिया आहे.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींसाठी ८० टक्के, दिव्यांग प्रवर्गासाठी ३ टक्के, अनुसूचित जमातीसाठी १० टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी ५ टक्के आणि विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी २ टक्के आरक्षित जागा आहेत. प्रवेशासाठी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा जातीचा, उत्पन्नाचा, रहिवासी दाखला, विद्यार्थी नोंद पत्रिका, विद्यार्थिनी आणि पालकांचे चार रंगीत छायाचित्रे, आधार कार्ड आणि बँक पासबुक या कागदपत्रांची आवश्यकता आहे. निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठीचा अर्ज मुलांची निवासी शाळा पेठ (आंबेगाव), दिवे (सासवड), तरंगवाडी (इंदापूर), मुलींची निवासी शाळा चांडोली (राजगुरुनगर) येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्याध्यापक एम. एम. वाघमारे यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT