पुणे

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

CD

पुणे, ता. ४ : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. त्रासाला कंटाळून पत्नीने मंगळवारी (ता. २) धनकवडी येथील राहत्या घरात आत्महत्या केली होती.

शिवानी दीपक दामगुडे (वय २४, रा. सुवर्णयुग शाळेच्या मागे, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी पती दीपक विठ्ठल दामगुडे (वय ३०) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत शिवानी यांचे वडील काशिनाथ काळू राऊत (वय ५०, रा. कोपरखैरणी, नवी मुंबई) यांनी बुधवारी (ता. ३) सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचे २०१९ मध्ये दीपक दामगुडे याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपी पतीने शिवानीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला बेदम मारहाण केली. तिला वारंवार शिवीगाळ करून सोडून देण्याची धमकी दिली. पतीकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून शिवानी यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राऊत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

हडपसरमध्ये विवाहितेची आत्महत्या
पती व सासू-सासरे यांच्याकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवानी सिद्धार्थ थोरात (वय २६) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. शिवानी यांनी सोमवारी (ता. १) हडपसर भागातील काळेपडळ येथील शिवराय कॉलनीत आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सिद्धार्थ बिभीषण थोरात, सासू, सासरे बिभीषण थोरात (सर्व रा. शिवराय कॉलनी, काळेपडळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवानी यांचे वडील सुनील कामण्णा शिवपुजे (वय ५३, रा. पाटस ता. दौंड) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: आरोपींसाठी शिक्षा वेदनादायक नसेल, तोपर्यंत...; सरन्यायधीशांचे मोठे संकेत! शिक्षेची तीव्रता वाढणार? मोदी सरकारही शॉक

रिस्क नको, BMCमध्ये सत्तेसाठी भाजप-शिवसेनेच्या सावध हालचाली; महायुती म्हणून नोंदणी करणार, अखेरच्या क्षणी निर्णय बदलला

Donald Trump Trade Policy : डोनाल्ड ट्रम्प पडले एकटे, भारत बनणार जागतिक आर्थिक बदलाचे केंद्र, व्यापारी राजकारण वेगळ्या वळणावर

Sangli Crime : सांगलीत चाललंय काय? मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यावर घरासमोरच प्राणघातक हल्ला; वार केल्यानंतर पोटात चाकू अडकून बसला अन्...

Arijit Singh Retirement : शेवटी मी धाडस केलं! अरिजीत सिंहने सांगितलं निवृत्तीचं कारण, म्हणाला, मी जगू शकेन

SCROLL FOR NEXT