Monsoon Update  Sakal
पुणे

Monsoon Update : मॉन्सूनच्या प्रवासासाठी पोषक वातावरण

अंदमान समुद्रात मॉन्सूनने यंदा वेळेपूर्वी सलामी दिली. मात्र, त्यानंतर पुढील तीन दिवस त्याने याच भागात मुक्काम ठोकला होता.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : अंदमान-निकोबार बेटांवर गेल्या तीन दिवसांपासून मुक्काम ठोकलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याने (मॉन्सून) बुधवारी पुढचा प्रवास सुरू केला. त्याने श्रीलंकेचा अर्धा भाग व्यापला आहे. मॉन्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

अंदमान समुद्रात मॉन्सूनने यंदा वेळेपूर्वी सलामी दिली. मात्र, त्यानंतर पुढील तीन दिवस त्याने याच भागात मुक्काम ठोकला होता. तेथून आता मॉन्सूनचा पुढील प्रवास सुरू झाला. त्याने श्रीलंकेचा जवळपास निम्मा भूभाग व्यापला आहे. उर्वरित अंदमान बेटांसह बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे.

अंदमान-निकोबार बेटसमूह आणि मालदीवमध्ये रविवारी मॉन्सूनचे आगमन झाले. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून, अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. अरबी समुद्रातून प्रगती करत मालदीवचा आणखी काही भाग, कोमोरिन समुद्राचा भाग आणि श्रीलंकेच्या निम्म्या भूभागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.

मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने अंदमान बेट समूहाच्या उर्वरित भागासह पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. दरम्यान, मॉन्सूनचे केरळमधील आगमनही लवकर होत असून ३१ मेपर्यंत भारताच्या मुख्य भूमीवर मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. वेगाने सुरू असलेली वाटचाल पाहता मॉन्सूनच्या केरळातील आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चक्रीवादळाचे संकेत

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ईशान्य दिशेकडे सरकत असलेल्या प्रणालीचे उद्यापर्यंत (ता. २४) तीव्र कमी दाब क्षेत्रात (डिप्रेशन) रूपांतर होणार आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushila Karki: Gen-Z चा नायक सुशीला कार्कींसमोर नतमस्तक; कोण आहे सुदन गुरुंग?

आता CIBIL Score वाढवण्यासाठी ChatGPT मदत करणार, पण कशी? जाणून घ्या...

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

विकासासाठी शांतता हवी, मणिपूरमधील संघटनांना पंतप्रधान मोदींचं आवाहन; राज्यातील परिस्थितीवरही बोलले

Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील १.२६ कोटींहून अधिक लाडक्या बहिणींना मिळणार आर्थिक लाभ; मुख्यमंत्री यादव यांची घोषणा

SCROLL FOR NEXT