पुणे

मोहोळांच्या विजयाला मिसाळांचा हातभार

CD

पर्वती विधानसभा मतदारसंघ
मंगेश कोळपकर
भाजपला लोकसभा निवडणुकीच्या निकालात चांगले मताधिक्य मिळण्याची अपेक्षा असलेल्या मतदारसंघांपैकी पर्वती हा एक मतदारसंघ. त्यामुळेच या मतदारसंघावर भाजपची भिस्त होती. त्यानुसार या मतदासंघाने भाजपला सुमारे २९ हजारांचे मताधिक्य दिले आणि मुरलीधर मोहोळ यांचा विजय सुकर झाला. लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीत या मतदारसंघाने तेव्हाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना तब्बल ६६ हजार ३३२ मतांचे मताधिक्य दिले होते. तर, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार माधुरी मिसाळ यांना ३६ हजार ७२८ मतांची आघाडी मिळाली होती.
पर्वती मतदारसंघात महापालिकेचे आठ प्रभाग आहेत. त्यातील दोन प्रभागांतील निम्माच परिसर या मतदारसंघात येतो. त्यातील पर्वती मतदारसंघात २७ नगरसेवक येतात. त्यापैकी २० नगरसेवक भाजपचे होते. त्याशिवाय दोन स्वीकृत नगरसेवकही भाजपचेच होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ भाजपला मिळाली. मतदारसंघात ४० टक्क्यांहून अधिक भाग झोपडपट्टी आणि वस्ती स्वरूपाचा आहे. तसेच गृहरचना सोसायट्यांचे जाळेही मोठे आहे. दत्तवाडी, सानेगुरूजीनगर, महर्षीनगर, बिबवेवाडी, अप्पर, इंदिरानगर, जनता वसाहत आदी पूरग्रस्त वसाहतीही येथे आहेत. त्यात महापालिकेच्या वसाहतींचाही समावेश आहे. तसेच दांडेकर पूल, जनता वसाहत, डायस प्लॉट, पानमळा आदी झोपडपट्टी भागांतही मतदारांची संख्या मोठी आहे. सहकानरगर, पद्मावती, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, सॅलिसबरी पार्क, मुकुंदनगर इंदिरानगर परिसरात सहकारी गृहरचना संस्थांची संख्या मोठी आहे. मराठा, ओबीसी मतदारांबरोबच जैन, माहेश्‍वरी, मुस्लीम, ख्रिश्‍चन आदी धर्मियांचेही येथे प्राबल्य आहे. शिवाय मागासवर्गीय मतदारही येथे मोठ्या संख्येने आहेत. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात गेल्या पाच निवडणुकांत भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. आमदार माधुरी मिसाळ यांची यंदा येथे तिसरी टर्म आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ५५.४७ टक्के म्हणजे १ लाख ८९ हजार १८४ मतदारांनी मतदान केले. त्यात मोहोळ यांना १ लाख ३ हजार ५४२ तर, धंगेकर यांना ७४ हजार ५४५ मते मिळाली. गृहरचना संस्थांतून मोहोळ यांना चांगले मतदान झाले. तर, दांडेकर पूल, पानमळा, अप्पर इंदिरानगर, दत्तवाडी, नवी पेठ जनता वसाहत, तळजाई, डायस प्लॉट आदी भागांतून धंगेकर यांना चांगले मतदान झाले. खडकमाळ आळी, स्वारगेट पोलिस लाइन आदी भाग पर्वती मतदारसंघात येतो. तेथे धंगेकर यांना ३८४ मतांचे मताधिक्य मिळाले. तर, सॅलिसबरी पार्क परिसरातून (प्रभाग क्र. २८) मोहोळ यांना सुमारे ८ हजारांचे, सिंहगड रस्ता परिसरातून (प्रभाग ३४) ६ हजार ८३२, सहकारनगर परिसरातून (प्रभाग ३५) ६ हजार ११७ , बिबवेवाडी परिसरातून (प्रभाग ३६) ५ हजार ३६७ हजार मतांचे मताधिक्य मिळाले. मात्र, नवी पेठ (प्रभाग २९) येथून १८०७, दत्तवाडीमधून (प्रभाग ३०) १२७० आणि अप्पर इंदिरानगरमधून (प्रभाग ३७) केवळ १३३ मतांचे मताधिक्य मोहोळ यांना मिळाले. दत्तवाडी, नवी पेठ प्रभागाचा काही भाग कसबा मतदारसंघातही येते. तेथील पोटनिवडणुकीच्या वेळीही या भागावर भाजपचे लक्ष होते. परंतु, अपेक्षित मताधिक्य तेथून मिळाले नव्हते.

मतदारसंघातील प्रमुख समस्या
- मार्केटयार्ड परिसरात वाहतुकीची कोंडी
- जड वाहनांची दिवसाही होणारी वाहतूक
- सातारा रस्त्यावरील बीआरटीची दुरवस्था
- ससूनच्या धर्तीवर सार्वजनिक रुग्णालयाची कमतरता
- पावसाळी वाहिन्यांची दुरवस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT