yerwada crime esakal
पुणे

Pune Crime: पार्किंगचा वाद भोवला..! निवृत्त जवानाने गोळी झाडल्याने एकाचा मृत्यू

Yerawada Crime: पार्किंगवरून झालेल्या वादाचा राग मनात धरून पाटीलने बंदुकीतून झाडलेली गोळी लागून शहानवाज याच्या डोक्यात लागली.

CD

पुणे/विश्रांतवाडी, ता. १ : पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने केलेल्या गोळीबारात टेम्पोचालकाचा बळी गेला. येरवडा परिसरातील अशोकनगरमधील श्रीराम मित्र मंडळाजवळ गुरुवारी (ता. ३१) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

शहानवाज मुलाणी (वय ३५) असे मृताचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी दिलशाद (वय ३३, (रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी निवृत्त जवान श्रीकांत श्यामराव पाटील (वय ४५, रा. श्रीराम मित्र मंडळ) याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याला याला अटक करण्यात आली. मुलाणी आणि पाटील शेजारी राहतात.

पार्किंगवरून झालेल्या वादाचा राग मनात धरून पाटीलने बंदुकीतून झाडलेली गोळी लागून शहानवाज याच्या डोक्यात लागली. ते गंभीर जखमी झाले. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील आणि पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT