पुणे

शिका फायदेशीर स्टोन क्रशर व्यवसाय

CD

पुणे, ता. १० : स्टोन क्रशर व्यवसायाबाबत मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण १२ ऑक्टोबरला आयोजिले आहे. यात व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी परवानग्या, जमीन निवडीपासून मशिन सेटअप आणि मार्केटिंग, व्यवसायाचे प्रारूप, महसूल स्रोत, सरकारी एनओसी, कायदेशीर प्रक्रिया, जागेची निवड, जमीन सर्वेक्षण आणि मशिन बसवणे यांचा समावेश आहे. सहभागींना प्रकल्पाचा खर्च, खाणकाम, यंत्र देखभाल, आर्थिक व्यवस्थापन आणि विपणन धोरणांबद्दल माहिती मिळेल. या क्षेत्रात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या किंवा वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी हे एक परिपूर्ण प्रशिक्षण आहे. तज्ज्ञांच्या सूचना आणि व्यावहारिक मार्गदर्शनासह सहभागींना आत्मविश्वासाने यशस्वी क्रशर व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठीचे मार्गदर्शन व उद्योगातील तज्ज्ञांकडून शिकण्याची ही अमूल्य संधी आहे.

जुन्या इमारतींचा पुनर्विकास
यूडीसीपीआर नियमामुळे महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रीडेव्हलपमेंट) सुरु आहे किंवा होणार आहे. हा नियम काय आहे? त्यामुळे एफएसआय कसा व किती वाढला? त्याचा वापर कसा करायचा? फिसिबिलीटी रिपोर्ट कशासाठी काढतात? पीएमसी म्हणजे काय? आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा १२ ऑक्टोबरला आयोजिली आहे. यामध्ये इमारतींचा पुनर्विकास करण्याची पद्धत, पेपर्स, विकसक कसा निवडावा, जुन्या सभासदांना होणारे फायदे, करारनामा कसा करावा, महारेरा रजिस्ट्रेशन आदी सर्व मुद्यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. सोसायटी स्वयंपुनर्विकास करू इच्छिणारे, नवीन विकसक, ज्यांना रीडेव्हलपमेंट क्षेत्रात रस आहे असे सर्वजण, रिअल इस्टेट एजंट यांच्यासाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.


शेवगा लागवड, उत्पादन व निर्यात संधी
स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात नियमित मागणी असणाऱ्या शेवग्याचा आयुर्वेद औषधींमध्येही वापर वाढला आहे. शेवगा पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन व निर्यात व्यवस्थापनाबाबत माहिती करून देणारी कार्यशाळा १२ ऑक्टोबरला आयोजिली आहे. कार्यशाळेत निर्यातक्षम शेवगा उत्पादन पद्धती, आधुनिक जाती, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणी, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, निकष, ट्रेसिबिलीटी, शेवगा निर्यातीसाठी गुणवत्तेची पडताळणी, परकीय बाजारपेठ, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायनमुक्त उत्पादन, निर्यातीसाठी कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियम इ. संदर्भात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

मेडिकल कोडिंग प्रमाणपत्र प्रशिक्षण
वैद्यकीय क्षेत्रात करिअरसाठी मेडिकल कोडिंग हा तीन महिन्यांचे प्रमाणपत्र प्रशिक्षण एसआयआयएलसी व टेक महिंद्रा यांच्यावतीने २५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यामध्ये सीपीसी (सर्टिफाइड प्रोफेशनल कोडर) प्रमाणपत्र तयारीचे मार्गदर्शन तसेच केपीओ (नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग) व बीपीओ (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) साठीचे मार्गदर्शन होणार आहे. मेडिकल शब्दावलीची ओळख, मेडीकल सेवा भाषेची समज, शरीर विज्ञान आणि शारीरिक रचना, कोडिंग प्रणाली : आयसीडी-१०, सीपीटी आणि एचसीपीसीएस कोडिंग, वैद्यकीय सेवा नियमावली (एचआयपीएए), कोडिंग नियम व मार्गदर्शक तत्त्वे, कोडिंग सराव इ. चा समावेश आहे. सायन्स विषयातील २१ ते २५ वयोगटांतील पदवीधारक, व्यावसायिक, मेडिकल कोडिंगमध्ये करिअर करू इच्छिणारे प्रवेशास पात्र आहेत.

संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogesh Kadam Reaction : “छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही” ; मंत्री योगेश कदमांचं विरोधकांना प्रत्युत्तर!

Akhilesh Yadav Facebook Account Ban : सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे फेसबुक अकाउंट बंद; तांत्रिक चूक की आणखी काही?

गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी बातमी! जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराची ४० प्रकरणे समोर, तपास सुरू

Duplicate Currency : कोल्हापूरात बनावट नोटा बनवणारी टोळी उघडकीस; एक कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, टोळीचा मास्टर माईंड कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचारी

Jaykumar Gore : बार्शीच्या राऊतांचा पराभव एक अपघात होता; तालुक्याच्या विकासाचा वेग खंडित झाला

SCROLL FOR NEXT