पुणे

‘दगडूशेठ’समोर हजारो महिलांचे अथर्वशीर्ष पठण

CD

पुणे, ता. २८ : एकाच वेळी हजारो महिलांनी एकत्र येऊन ‘ओम गं गणपतये नमः’ म्हणत केलेल्या अथर्वशीर्ष पठणाने भक्तीमय वातावरणाची अनुभूती भाविकांनी घेतली. गणेशनामाचा जयघोष करत ॠषिपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात ऊर्जेने भारलेले वातावरण पाहायला मिळाले.
निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, पुणे विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर, न्यायाधीश किरण क्षीरसागर, प्रसेनजीत फडणवीस, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे हे ४० वे वर्ष होते. यावेळी जवळपास ३५ हजार महिला उपस्थित असल्याची माहिती मंडळाने दिली.
पावसाची रिमझिम असली तरी पारंपरिक वेशात रात्री दोन वाजेपासूनच महिला या उपक्रमासाठी उपस्थित होण्यास सुरुवात झाली होती. पहाटे महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर ओंकाराचा जप, ‘गजानना गजानना, मंगलमूर्ती गजानना’ या गीताच्या सादरीकरणाने वातावरण भारून गेले. महिलांनी अथर्वशीर्ष पठण करत गणरायाला नमन केले. ‘दगडूशेठ’च्या उत्सव मंडपापासून ते नाना वाड्यापर्यंतचा परिसर गर्दीने फुलला होता. ऍना मारा या इटली येथील अभिनेत्रीनेदेखील या सोहळ्यात सहभाग घेतला होता.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘‘केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे भारतासह विविध ठिकाणांहून महिला मोठ्या संख्येने या उपक्रमासाठी आल्या आहेत. गणरायाच्या आशीर्वादाने सगळ्यांना हे वर्ष आरोग्य, प्रगती आणि भरभराटीचे जावो.’’
यावेळी अर्चना भालेराव, प्रा. गौरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test Live: भन्नाट चेंडू... मोहम्मद सिराजने विंडीजच्या शतकवीराला 'गुडघे' टेकायला भाग पाडले; नावावर मोठा विक्रम

Diwali 2025: दिवाळीच्या दिवशी तुळशी पूजनाने बदला नशीब, दूर करा पैशांची अडचण

भारत-पाकिस्तानला 'ही' भीती दाखवली अन् युद्ध थांबलं ? ट्रम्प यांनी टाकला नवा बॉम्ब, खळबळजनक दावा

Diwali Window Cleaning Tips: या दिवाळीत खिडक्या करा चमकदार! घरगुती सोप्या उपायांनी मिळवा नवीनसारखी झळाळी

Latest Marathi News Live Update: बारामतीची गण आरक्षण सोडत जाहीर, 8 वर्षांनी निवडणुकीमुळे रंगत वाढली

SCROLL FOR NEXT