पुणे

व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला

CD

व्यावसायिकदृष्ट्या आधुनिक हायड्रोपोनिक तंत्राने भाजीपाल्याची शेती करून दर्जेदार गुणवत्तेचे उत्पादन कसे मिळवावे, पायलट बेसिसवर हा प्रयोग कसा करावा इ. विषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १३ व १४ सप्टेंबर रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची ओळख, आवश्यक साधने व फर्टिगेशन, पाण्याची गुणवत्ता व आवश्यक अन्नद्रव्ये, देशी-विदेशी भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती इ. प्रकारचा भाजीपाला कसा पिकवावा, घरच्या घरी हायड्रोपोनिक युनिट अथवा गार्डन कसे उभारावे, हायड्रोपोनिकसाठी रोपे कशी तयार करावी, न्यूट्रियंट सोल्यूशन कसे तयार करावे, सामू, प्रकाश, आर्द्रता, तापमान यांचे महत्त्व, अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय आदींविषयी सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

अन्न सेवा उद्योग कार्यशाळा
अन्न सेवा उद्योगातील उद्योजक, हॉटेल/रेस्टॉरंट मालक आणि नवउद्योजकांसाठी एक विशेष एकदिवसीय कार्यशाळा १४ सप्टेंबर रोजी आयोजिली आहे. यामध्ये हॉटेल, कॅफे, क्लाउड किचन व ढाबा व्यवसायाचे नियोजन, ब्रँडिंग, स्थान धोरण, कर्मचारी धोरण, किचन व फ्लोअर व्यवस्थापन, विपणन व ग्राहक व्यवहारांविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. पारंपरिक व आधुनिक व्यवसायातील बदल, तंत्रज्ञानाचा वापर, खर्चाचे नियोजन व शाश्वत व्यवसाय प्रारूप तयार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच हॉटेल/रेस्टॉरंट व्यवसाय सुरू करताना आवश्यक २१ महत्त्वाचे टप्पे, क्लाउड किचन, स्विगी व झोमॅटोची कार्यप्रणाली, कमिशन व नफा वाढीचे तंत्र, फूड स्टॉल्स, ढाबा व कॅफे आदींद्वारे स्थानिक स्तरावर प्रभावी व्यवसाय कसा उभारायचा, स्टाफिंग, किचन लेआउट, पीओएस प्रणाली, इन्व्हेंटरी व फायनान्स नियोजन, फ्रँचायझी मॉडेल आदींबाबतही मार्गदर्शन होणार आहे. फूड इंडस्ट्रीत स्वतःचा ठसा उमटवू इच्छिणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची संधी आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

होम गार्डनिंग कार्यशाळा
घराच्या आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या जागेमध्ये गार्डनची निर्मिती कशी करावी, यामध्ये गार्डनचे वेगवेगळे प्रकार जसे की किचन गार्डन औषधी वनस्पतींचे गार्डन, अँटी डायबेटिक गार्डन, गार्डन उभारणीची तत्त्वे, गार्डनमधील रंग संकल्पना, बाल्कनी गार्डन, टेरेस गार्डन, भिंतीवरती केले जाणारे व्हर्टिकल गार्डन, इनडोअर गार्डन यावर मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा १५ सप्टेंबर रोजी आयोजिली आहे. घरामधील कचऱ्याचे नियोजन करून त्यापासून कंपोस्ट निर्मिती. घरगुती खते बनवण्याच्या पद्धती ज्या आपल्याला आपल्या गार्डनमध्ये वापरता येतील. तसेच गार्डनची काळजी कशी घ्यावी, पाणी व खताचे नियोजन, रोग व किडींचे नियंत्रण आदींबाबत माहिती दिली जाणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bengaluru Highway : मोठी बातमी! पुणे-बंगळूर महामार्ग काही काळासाठी बंद; कधी सुरु होणार मार्ग? वाहनांच्या लागल्या लांबलचक रांगा, काय आहे कारण?

Security Warning : तुमचा फोन आहे धोक्यात! सरकारने 'या' 4 कंपनीचे मोबाईल वापरणाऱ्यांना दिला इशारा; पटकन करा 'हे' काम नाहीतर...

Uddhav Thackeray : अहमदाबादचं नामांतर कधी? उद्धव ठाकरेंना कळली संघाची अंदर की बात! अमित शहा आणि मोदींबद्दल दिली मोठी अपडेट

Parliament Winter Session: १९ दिवस १५ बैठका अन्... संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू होणार; पाहा संपूर्ण तपशील

UPSC IFS Main Exam 2025: UPSC IFS मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर; आता असे करा डाउनलोड

SCROLL FOR NEXT