पुणे

नातू विद्यामंदिरचा संगीत महोत्सव

CD

पुणे, ता. ६ : भारतीय विद्या भवन सुलोचना नातू विद्यामंदिर येथे आयोजित केलेल्या आंतरशालेय संगीत महोत्सव उत्साहात पार पडला. ही स्पर्धा विद्यार्थी गट व शिक्षक गट अशी दोन गटांत विभागून झाली. यंदा २१ शाळांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी १९ शाळा विद्यार्थी गटातून व तीन शाळा शिक्षक गटातून सहभागी झाल्या. विद्यार्थ्यांसाठी ‘देशभक्तिगीत’ हा विषय तर शिक्षकांसाठी ‘गवळण’ आणि ‘पोवाडा’ हा विषय होता. विद्यार्थी गटात प्रथम आरएमडी सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल वारजे, द्वितीय पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव आणि तृतीय पारितोषिक एम.ई.एस. बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल यांनी पटकाविले. उत्तेजनार्थमध्ये इंदिरा नॅशनल स्कूल वाकड यांचा समावेश आहे. शिक्षक गटात प्रथम एम.ई.एस. बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल व द्वितीय पारितोषिक पी.ई.एस. मॉडर्न प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल शिवाजीनगर यांनी पटकाविले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून राजश्री महाजनी व कल्याणी जोशी काम पाहिले. स्पर्धेचे नियोजन संगीत शिक्षक योगेश कुलकर्णी, केदार तळणीकर आणि तुषार दीक्षित यांनी केले होते. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका फिलोमिना गायकवाड व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आरती सचदेव उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी ‘रिडिंग बीज्’ उपक्रम
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शनिवार पेठेतील एन्. ई. एम्. एस्. शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘रिडिंग बीज्’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. नारायण पेठ येथील पुणे मराठी ग्रंथालयाच्या बाल विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्याला मराठी आणि इंग्रजी भाषेतील विविध गोष्टींची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या उपक्रमामुळे मुलांसाठी जास्तीत जास्त पुस्तकं मिळणार असून त्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होईल. या उपक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी, ग्रंथालयाचे कार्यवाह सुधीर इनामदार, सहकार्यवाह विद्युत पावगी, कार्याध्यक्ष श्रीकांत देव, कोषाध्यक्ष शरद घाणेकर, कार्यकारी मंडळ सदस्य नंदकुमार खेडकर, शिक्षक आणि पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

मराठे विद्यालयात राखी बनविण्याचे प्रशिक्षण
पुणे : खराडी येथील गेनबा सोपानराव मोझे संस्थेच्या सुंदरबाई मराठे विद्यालयातील विद्यार्थिनी कला कौशल्य उपक्रमांतर्गत पाचशे राखी तयार केली. कला शिक्षक जेम्स साखरे यांनी राखी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. यातील शंभर राख्या भारतीयांचे सीमा रेषेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांना पाठविल्या. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मोझे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, शाळा समिती अध्यक्षा अलका पाटील, मुख्याध्यापक संजय सोमवंशी, पर्यवेक्षक सुनील वळसे यांनी शिक्षक व मुलींचे कौतुक केले.

मूक-बधिर विद्यालय बिबवेवाडी प्रथम
पुणे : बाल कल्याण संस्था, पुणे आयोजित दिव्यांग मुला मुलींच्या जिल्हास्तरीय अम्ब्रेला पेंटिंग स्पर्धेमध्ये आधार मूक-बधिर विद्यालय बिबवेवाडी शाळेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. स्पर्धेतील विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक विजयकांत कुचेकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आधार मंडळाचे अध्यक्ष प्रा. श्रीरंग उमराणी, विश्वस्त विद्या गोखले व मुख्याध्यापक जयंत वानखेडे उपस्थित होते.

इको क्लबची स्थापना
पुणे : हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र आणि एक पेड माँ के नाम या शासनाच्या उपक्रमांतर्गत हुजूरपागा कात्रज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतर्फे नानासाहेब धर्माधिकारी वनोद्यान कात्रज येथे इको क्लबची स्थापना करून वृक्षारोपण केले. आठवी ते दहावीच्या ८५ विद्यार्थिनींनी या उपक्रमात सहभाग घेतला. नारळ, वड, पिंपळ, कडुनिंब, आंबा, सीताफळ, फणस, रिठा यासारख्या पन्नास रोपे लावण्यात आले. त्यानंतर झाडे लावा झाडे जगवा, हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र एक पेड माँ के नाम अशा घोषणा देत शाळेच्या परिसरात रॅली काढली. वृक्षारोपणासाठी नागनाथ शिंदे व उत्तम पानसरे यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापिका सुधा कांबळे, वरिष्ठ शिक्षिका माधुरी पन्हाळे, अर्चना ठाकरे, सुप्रिया भोसले, सारिका पाटील, सुयोग कांदे, सचिन पवार, माजी नगरसेविका मनीषा कदम, राजाभाऊ कदम उपस्थित होते.

सैनिकांसाठी राख्या, शुभेच्छापत्रे
पुणे : विद्या प्रसारणी सभेच्या विद्यावर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राख्या आणि शुभेच्छापत्रे सीमेवरील सैनिक बांधवांना पाठवून बंधुभावाचे अतूट नाते जपले. या वेळी संस्थेचे संचालक नंदकिशोर एकबोटे, प्राचार्या रेणू सुबांली, अध्यक्ष विजय भुरके यांनी मार्गदर्शन केले. शिक्षिका शुभांगी परदेशी यांनी या उपक्रमाचे आयोजन केले, तसेच श्वेता मिसाळ, नुरजहॉं शेख, हर्षद मिसाळ व बाबासाहेब तिकोणे यांचे सहकार्य केले.

उत्कर्ष क्रिएशनच्या दहा विद्यार्थ्यांचे यश
पुणे : मलेशियातील आय सिटी फायनान्स अव्हेन्यू येथे आयोजित आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत गोखलेनगर येथील उत्कर्ष क्रिएशनच्या दहा विद्यार्थ्यांनी यशस्वी झाले. या स्पर्धेत जगभरातील ३७ देशांतील एकूण ४८८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रियांश देवकर या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला, तसेच रियांश निकालजे, विविधा शहा, पार्थ खटपे आणि रुद्र बोडके या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तर विदेही शहा, मीत शहा, मैथिली चव्हाण, मिताली इंगळे आणि विहान शहा या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. अमित शिंदे व संध्या शिंदे यांच्याद्वारे संचलित उत्कर्ष क्रिएशन गोखलेनगर संस्थेमध्ये ५ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या बौद्धिक विकासावर अबॅकसच्या माध्यमातून भर दिला जातो. तसेच आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी राज्यस्तरीय स्तरावर त्यांची स्पर्धा घेतली जाते. उत्कर्ष क्रिएशनच्या यशस्वी कामगिरीची दखल घेत या वर्षी या संस्थेला ‘बेस्ट कोच इन्स्टिट्यूट’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticized USA : भारतावर 'टॅरिफ बॉम्ब' फोडणाऱ्या अमेरिकेला आता चीननेही सुनावलं!

Gold Village: सोन्याचा पाऊस पडणारं गाव! महाराष्ट्रातील 'या सोनेरी गावाची' कहाणी तुम्ही ऐकलीये का?

Male News : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! शनिवारपासून अंधारबन, कुंडलिका व्‍हॅली पर्यटकांसाठी खुली, ऑनलाईन बुकिंग बंधनकारक

Vice President Election Update: मोठी बातमी! उपराष्ट्रपती पदाबाबतचा निर्णय, पंतप्रधान मोदी अन् जे.पी.नड्डा घेणार; 'NDA' बैठकीत ठराव

Latest Maharashtra News Updates: वडील रागावल्यामुळे मुलाने केली आत्महत्या, पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT